हनीमूनसाठी भारतातील १० सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 12:26 PM2018-04-09T12:26:10+5:302018-04-09T12:26:58+5:30

लग्नाच्या आधीपासूनच स्पेशल जागेचा शोध घेणं सुरु होतं. पण हे फारच डोकंखाऊ काम आहे. अनेक दिवस ठिकाणच फायनल होत नाही.

India's 10 Most Romantic Destination for Honeymoon | हनीमूनसाठी भारतातील १० सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

हनीमूनसाठी भारतातील १० सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

googlenewsNext

लग्न झाल्या झाल्या नव्या जोडप्यासह सर्वांनाच उत्सुकता असते ती हनीमूनची….प्रत्येक कपल आपल्या हनीमूनबद्दल अनेक स्वप्न रंगवत असतात. लग्नाच्या आधीपासूनच स्पेशल जागेचा शोध घेणं सुरु होतं. पण हे फारच डोकंखाऊ काम आहे. अनेक दिवस ठिकाणच फायनल होत नाही. त्यामुळे हनीमूनला नेमकं कुठं जायचं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तशी तर प्रत्येकालाच हनीमूनसाठी परदेशात जाण्याची इच्छा असते. पण सर्वसामान्य कपल्सना ते शक्य होत नाही. त्यांच्यासाठी भारतातच काही खास हनीमून डेस्टिनेशन्स आहेत. या ठिकाणावरही तुम्ही धमाल-मस्ती करू शकता. आणि तुमचा पहिलाच हनीमून तुम्ही नेहमीसाठी यादगार करू शकता. असेच काही १० डेस्टिनेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१०) डलहौजी:

हिमाचल प्रदेशातील डलहौजीमध्ये हिरवेगार डोंगरही आहेत आणि बर्फाने झाकलेले डोंगरही. या ठिकाणाला हनीमूनसाठी परफेक्ट सांगितलं जातं. यासोबत येथील रोलिंग हिल्स आणि शांत डोंगरद-या लग्नानंतरची लाईफ सुरू करण्यासाठी एक चांगलं डेस्टीनेशन मानलं जातं. डलहौजी हे शहर इंग्रजांनी वसवलेलं हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे थंड हवेचे ठिकाणही म्हणून प्रसिद्ध आहे. 

९) श्रीनगर:

पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणा-या श्रीनगरला भारतातील सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन मानलं जातं. इथली डल लेक आणि शालीमार बाग, निशत बागसारखे शानदार-सुंदर गार्डन तुम्हाला अतिशय वेगळा अनुभव देतात. यासोबतच कपल्स इथल्या गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगम या ठिकाणांनाही प्राध्यान्य देतात.

8.उदयपुर

राजस्थानमधील हे शहर सिटी ऑफ लेक्स नावाने लोकप्रिय आहे. या शहराला ईस्टमधील व्हेनिसही म्हटलं जातं. भारतातील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी हे एक शहर आहे. अरावलीच्या डोंगराला लागून असलेल्या येथील लेक आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. येथील ताज लेक पॅलेस हे हेरिटेज हॉटेलही लोकप्रिय आहे. मे आणि जून महिन्यात लग्न करणा-यांसाठी ही जागा परफेक्ट आहे.

7.माउंट आबू

राजस्थानच्या वाळवंटात असलेलं एकुलतं एक हिल स्टेशन नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलेलं आहे. ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी.दुर आहे. येथील डोंगर आणि सुंदर निसर्ग तुमचा हनीमून नेहमीसाठी यादगार करेल. विकेंड्सला गुजरात, राजस्थान आणि दिल्लीवरून मोठ्या संख्येने लोक येथे येतात.

6.मुन्नार

येथील नैसर्गिक सुंदरतेमुळे या जागेला साऊथमधील रत्नही म्हटलं जातं. केरळमधील मुन्नारमध्ये असलेल्या चहाच्या बागा या जागेला एक परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन बनवतात. थंडी स्वच्छ हवा आणि धुक्याने येथील वातावरण तुमचं मन प्रसन्न करतं. कपल्सला हे ठिकाण अधिक आवडतं. हिवाळ्यात तर इथे एकदा नक्की भेट द्यायला हवी.

5.अलप्पुझा 

केरळमध्ये दिवसभर चालणा-या या हाऊसबोटवर एखाद्या हॉटेलच्या रूमसारखी सेवा दिली जाते. इथे कपल्स पाण्यात आपला दिवस घालवू शकतात. ही बोट जंगलात तयार झालेल्या कॅनोलमधून जाते. ज्यामुळे कपल्स स्व:ताला निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव घेऊ शकतात. यासोबत इथे असलेले हेरिटेज मेंशन आणि वेअर हाऊस या ठिकाणाला परफेक्ट डेस्टिनेशन बनवतात.

4.लडाख

हे ठिकाण नेहमीच प्रत्येकासाठी आकर्षण राहिलं आहे. या ठिकाणाला लॅंड ऑफ लामा आणि लिटील तिब्बत असेही म्हटले जाते. येथील डोंगरातील रस्ते, द-या तुमच्यातीस रोमान्स जागा करतील. पण आरोग्याची समस्या असलेल्या लोकांना इथे येण्याआधी हेल्थ चेकअप करावे लागेल. कारण इथे उंच डोंगरात श्वास घेण्यास त्रास होतो.

3.कसौनी

कसौनी दिल्लीजवळ असलेलं सर्वात लोकप्रिय हनीमून डेस्टिनेशन आहे. उत्तराखंडमधील ही जागा हनीमूनसाठी देशभरात लोकप्रिय आहे. नैनीताल आणि अल्मोडा जाणा-या कपल्सनी इथे नक्की जावं.

2.मनाली

हे ठिकाण भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिमाचलमधील मनालीत प्रत्येक सीझनमध्ये जबरदस्त वातावरण असतं. हनीमूनसाठी ही जागा सर्वात चांगला पर्याय आहे. बर्फांच्या डोंगरातून निघणारी नदी या जागेला अतिशय सुंदर बनवते. यासोबतच इथे राफ्टिंगसोबत ट्रेकिंग आणि स्कीईंगचाही आनंद घेता येतो.

1.शिमला

हनीमूनसाठी शिमला नॉर्थ इंडियातील सर्वात लोकप्रिय जागा आहे. शिमलाला क्वीन ऑफ हिल्स या नावानेही ओळखलं जातं. येथील बर्फांचे डोंगर आणि शांत वातावरण या जागेला परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन बनवतात. यासोबतच स्कीईंग आणि स्केटींगचाही आनंद घेता येतो. इथे कोणत्याही वातावरणात तुम्ही जाऊ शकता.

Web Title: India's 10 Most Romantic Destination for Honeymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास