ख्रिसमस ट्रिपसाठी 'ही' 7 डेस्टिनेशन्स आहेत बेस्ट ऑप्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:50 PM2018-12-06T12:50:57+5:302018-12-06T13:04:15+5:30

सध्या वर्षाचा शेवटा महिना सुरू असून लवकरच ख्रिसमसच्या सुट्टा सुरू होणार आहेत. हा महिना जुन्या वर्षातील कडू-गोड आठवणी गाठीशी बांधून नवीन वर्षाची उत्साहात सुरूवात करण्याचा आहे.

Best budget 7 travel destinations in India for winters during christmas and new year | ख्रिसमस ट्रिपसाठी 'ही' 7 डेस्टिनेशन्स आहेत बेस्ट ऑप्शन!

ख्रिसमस ट्रिपसाठी 'ही' 7 डेस्टिनेशन्स आहेत बेस्ट ऑप्शन!

Next

सध्या वर्षाचा शेवटा महिना सुरू असून लवकरच ख्रिसमसच्या सुट्टा सुरू होणार आहेत. हा महिना जुन्या वर्षातील कडू-गोड आठवणी गाठीशी बांधून नवीन वर्षाची उत्साहात सुरूवात करण्याचा आहे. त्यामुळे या महिन्यात जवळपास सगळेच जण एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतात. महिन्याच्या सुरुवातीपासूनच बऱ्याचजणांनी प्लॅन केले आहेत. जे फिरण्याचे शौकीन आहेत त्यांनी तर कुठे जायचं याची तयारीही करून ठेवली आहे. कारण ख्रिसमसपासून ते न्यू ईयरपर्यंत मोठी सुट्टी मिळते. तुम्हीही या सुट्टीसाठी प्लॅन करत असाल आणि कमी बजेटमध्ये फिरण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही हटके डेस्टिनेशन्स सांगणार आहोत. या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता आणि नव वर्षाचं उत्साहात स्वागत करू शकता. 

1. केरळ

डिसेंबरमध्ये जेव्हा उत्तर भारतात थंडीची लाट आलेली असते त्यावेळी दक्षिण भारतातील देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील वातावरण मन प्रसन्न करणारं असतं. थंडीमध्ये फिरण्यासाठी केरळ बेस्ट डेस्टिनेशन मानलं जातं. येथे फिरण्यासाठी ट्रिप प्लॅन करत असाल तर वेगवेगळे पॅकेजेस अवेलेबल असतात. येथे राहण्यासाठी प्रत्येक बजेटमधील हॉटेल्स उपलब्ध आहेत. तसेच तुमच्यासाठी हाऊसबोटचाही पर्याय असतो. जो अगदी कमी बजेटमध्येही उपलब्ध होतो. 

2. गोवा

अनेकांचा असा गैरसमज होतो की, गोव्याला फिरणं फार महाग असतं. पण खरं पहायला गेलं तर गोव्यासारखं बजेट डेस्टिनेशन तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. गोव्यामध्ये फिरण्यासाठी वर्षभर अनेक देशी-विदेशी पर्यटक येत असतात. येथे राहण्याची आणि फिरण्याची व्यवस्था अगदी कमी खर्चातही करणं सहज शक्य होतं. येथे राहण्यासाठी अगदी स्वस्त दरात गेस्ट हाउस मिळतात. त्यामुळे तुम्ही गोव्याला जाण्याचा विचार करू शकता. 

3. पुद्दुचेरी

भारतीय संस्कृतीसोबतच तुम्हाला विदेशी संस्कृतीचाही अनुभव घेण्याची इच्छा असेल तर पुद्दुचेरी तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन ठरेल. डिसेंबरमध्ये येथील वातावरण फिरण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. येथे राहण्यासाठी अत्यंत कमी दरामध्ये आश्रम मिळतात. तुम्ही हॉटेल्सचाही पर्याय निवडू शकता. येथे फक्त 100 रूपयांमध्ये तुम्ही पोटभर जेवण करू शकता. 

4.  राजस्थान

डिसेंबर आणि जानेवारीमध्ये राजस्थानमधील वातावरण जास्त थंड नसते. त्यामुळे तुम्ही सहज फिरू शकता. तुम्हाला येथे महागड्या हॉटेल्सपासून अत्यंत स्वस्त असे हॉटेल्सही उपलब्ध होतील. तसेच येथे आश्रम आणि धर्मशाळांचेही ऑप्शन्स असतात. येथे राहणं आणि जेवणं घराप्रमाणे असून फार स्वस्त असतं. येथे ऐतिहासिक किल्ले, जुन्या हवेल्या यांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

5. मनाली

तुम्हाला थंडीमध्ये एखाद्या हिल स्टेशनला भेट द्यायची असेल तर मनाली तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. वेकेशनमध्ये येथे फार गर्दी असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिप अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण होते. येथे राहण्यासाठी स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्टदेखील उपलब्ध आहेत. 

6. धर्मशाळा

मनालीनंतर दुसरं बजेट डेस्टिनेशन म्हणजे धर्मशाळा. येथे वर्षभरात अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे तुमच्या बजेटनुसार राहणं आणि खाणं अगदी सहज शक्य होतं. येथे जाण्यासाठी 3 ते 4 दिवसांची ट्रिप प्लॅन करणं फायदेशीर ठरतं. 

7. जिम कॉर्बेट

तुम्हाला वाइल्डलाइफचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तराखंडातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बेस्ट ऑप्शन ठरेल. सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये जंगल सफारीचा आनंद अनुभवण्याची गंमत काही औरच. येथे राहण्यासाठी तुम्हाला बजेटमध्ये रिसॉर्ट उपलब्ध होतील. जंगल सफारीसाठी एक ठरावीक रक्कम भरावी लागते. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. 

Web Title: Best budget 7 travel destinations in India for winters during christmas and new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.