दारूच्या नशेत ठाण्यात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:31 PM2018-08-17T22:31:14+5:302018-08-17T22:34:40+5:30

शुक्रवारी भल्या पहाटेच्या सुमारास घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच एका मद्यपी तरुणाने घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या घोडबंदर भागात घडली. या घटनेने त्याच्या कुटूंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 Youth commits suicide in drunken liquor | दारूच्या नशेत ठाण्यात तरुणाची आत्महत्या

अनेक दिवसांपासून दारुच्या आहारी

Next
ठळक मुद्दे अनेक दिवसांपासून दारुच्या आहारी आईकडे वारंवार केली पैशांची मागणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : दारूच्या नशेत घोडबंदर रोडवरील एका इमारतीमधील करण ठक्कर (२१) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ या इमारतीमध्ये ठक्कर कुटूंबीय वास्तव्याला आहे. करण त्याचे आईवडिल आणि जुळ्या भावासह १२ व्या मजल्यावरील सदनिकेमध्ये वास्तव्याला होता. पदवीधर असलेल्या करणला दारूचे व्यसनही होते. गुरुवारी रात्री उशिरा तो नशेतच घरी आला होता. आल्यानंतर अवघ्या काही वेळाने पुन्हा त्याने आईकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र आईने ते देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने बेडरूममध्ये पहाटे ३ वा. च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटूंबियांना समजले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------

Web Title:  Youth commits suicide in drunken liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.