'नालेसफाई न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:18 AM2019-06-17T00:18:59+5:302019-06-17T00:19:29+5:30

नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांचा इशारा; अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

'Will take action against contractor not guilty' | 'नालेसफाई न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार'

'नालेसफाई न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार'

Next

बदलापूर : बदलापूरमधील नाल्यांची सफाई करण्यात काम चुकारपणा करणारे, योग्य प्रकारे काम न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांनी सांगितले. त्या कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकण्याचे निर्देश नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

नगराध्यक्ष जाधव यांनी शनिवारी पदाधिकारी व अधिकाºयांसमवेत नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. शिवसेना शहरप्रमुख व नियोजन समितीचे सभापती वामन म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती शीतल राऊत, मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, नगररचना अधिकारी विवेक गौतम, आरोग्य अधिकारी विजय कदम आदी दौºयात सहभागी झाले होते.

शिरगाव, आपटेवाडी या भागातील नाल्याची सफाई योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचे म्हात्रे यांनी मुख्याधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पालिकेने रस्तारूंदीकरण करताना रस्त्याच्याकडेला बंदिस्त गटार केले होते. हे गटार बुजवून त्यावर बांधकाम झाल्याचेही म्हात्रे यांनी मुख्याधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले.

पावसाळ्यात कुठेही नाले वा गटारे तुंबून पाणी भरणार नाही याची दक्षता घ्यावी. या कामात जे कंत्राटदार कुचराई करतील अशांवर कारवाई करावी. कंत्राटदार जर ऐकत नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देशही नगराध्यक्ष जाधव यांनी मुख्याधिकारी बोरसे यांना दिले.

सर्व बेकायदा बांधकामे हटवून गटार मोकळे करण्याचे आदेश बोरसे यांनी दिले. येत्या दोन दिवसात ही कारवाई पूर्ण करण्याचेही बोरसे यांनी यावेळी सांगितले. नाले सफाईचे काम व्यवस्थित सुरू आहे. काही ठिकाणी कचºयाचे प्रमाण वाढत आहे. तो कचरा काढून टाकण्यात येऊन नाले आणि गटारे मोकळी करण्यात येतील असे बोरसे यांनी यावेळी सांगितले. यामुळे यंदा पावसाळ्यात बदलापूरकरांना कमी त्रास सहन करावा लागेल, अशी आशा आहे.

शहरातील खेमानीसह इतर नाले तुंबलेल्या अवस्थेत असल्याने, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याची टीका होत आहे. जोरदार पाऊस आल्यास खेमानी नाल्यातील कचरा उल्हास नदीत वाहून जाण्याची भीती आहे. उल्हासनगरमध्ये मोठ्या नाल्यांसह लहान नाले सफाईचा ठेका खाजगी कंपनीला तब्बल ३ कोटींना देण्यात आला. नाले तुंबून वित्त तसेच जीवितहानी होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी सफाई केली जाते, मात्र जून महिना अर्धा उलटल्यानंतरही मोठ्या नाल्यासह लहान नाले कचºयाने भरलेले आहेत. आरोग्य विभागाने ८० टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाईचा दावा केला होता. आयुक्त सुधाकर देशमुख ज्या सेंच्युरी गेस्ट हाऊसमध्ये राहतात, त्यांच्या समोरूनच खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत जाते.

खेमानी नाल्यासह मोठ्या नाल्यांच्या सफाईचा दावा पालिका आरोग्य विभागाने केला. मात्र, खेमानी नाल्यासह गुलशननगर नाला, रमाबाई आंबेडकर शाळेसमोरील नाला, समतानगर येथील नाला, कैलास कॉलनीतील नाला अजूनही तुंबलेलेच आहेत. असे असताना पालिका आरोग्य विभाग कोणत्या आधारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाईचा दावा करते, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

मोठ्या नाल्यांप्रमाणे लहान नाल्यांची अवस्था आहे. नालेसफाईसाठी दररोज ३०० कंत्राटी कामगार काम करीत असल्याचे कागदावर सांगितले जाते. प्रत्यक्षात लहान नालेही तुंबलेल्या अवस्थेत आहेत. मग ठेकेदाराने नाल्याची सफाई केली का, असा प्रश्न विचारला जात आहे. तर नागरिकांनी नालेसफाईवर नाराजी व्यक्त करत नाले तुंबून वित्त आणि जीवितहानी झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title: 'Will take action against contractor not guilty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.