कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांना मिळणार रोजगार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:35 AM2018-06-19T03:35:53+5:302018-06-19T03:35:53+5:30

गामी पावसाळ्यात कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रथम त्यांच्या हाताला रोजगार देण्याची गरज लक्षात घेऊन त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रस्ताव एमजीनरेगाकडे पाठवण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांनी घेतला.

Will the families of malnourished children get employment? | कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांना मिळणार रोजगार?

कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांना मिळणार रोजगार?

Next

ठाणे : आगामी पावसाळ्यात कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रथम त्यांच्या हाताला रोजगार देण्याची गरज लक्षात घेऊन त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रस्ताव एमजीनरेगाकडे पाठवण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांनी घेतला. गाभा समिती बैठकीत या विषयावर झालेल्या चर्चेत त्यांनी नुकताच निर्णय घेतला.
‘१७७७ कुपोषितांना पावसाचा धोका; उपाययोजनांची गरज’ या मथळ्याखाली लोकमतने १० जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन संबंधित पालकांच्या रोजगाराचा प्रस्ताव मनरेगाकडे पाठवण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कालावधीत रोजगाराच्या शोधात असलेल्या संबंधित कुटुंबीयांचे आदिवासी, दुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या आरोग्यकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. यास वेळीच आळा घालण्यासाठी संबंधित कुटुंबीयांना गावातच रोजगार मिळवून देणे अपेक्षित आहे. गाभा समितीच्या बैठकीत उपजिल्हाधिकाºयांनी सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रस्ताव नरेगाकडे पाठवण्याचे सूतोवाच केले.

Web Title: Will the families of malnourished children get employment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.