दहिसर येथील विधवा महिलेचे घर तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:13 PM2017-12-28T23:13:25+5:302017-12-28T23:13:27+5:30

दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी या गरीब विधवा महिलेचे घर पालिकेच्या आर उत्तर विभागाने तोडले.

The widow of Dahisar broke the house of a woman | दहिसर येथील विधवा महिलेचे घर तोडले

दहिसर येथील विधवा महिलेचे घर तोडले

Next

मनोहर कुंभेजकर
 मुंबई--दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी या गरीब विधवा महिलेचे घर पालिकेच्या आर उत्तर विभागाने तोडले.शिवसेनेने आर उत्तर सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांना आज त्यांच्या दहिसर पश्चिम येथील आर उत्तर पालिका विभाग कार्यालयात चक्क 5 तास घेराव घातला.त्यावर लेखी माफी मागून नजरचुकीने ही तोडक कारवाई करण्यात आली असून परत सदर बांधकाम  बांधून देण्याचे लेखी आश्वासन देण्याची नामुष्की या सहाय्यक पालिका आयुक्तांवर आली.
 विशेष म्हणजे पतीच्या निधनानंतर 11 व्या दिवशी आणि घरात तीन विधवा असतांना त्यांनी ही माणुसकीला काळिमा फासणारी निर्दयी कारवाई केली ,तर या जागेलगत 100 वर्षे जुने घर असलेल्या वैशाली पवार या कुटुंबाची संरक्षक भिंत तोडली अशी माहिती आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी केला आहे.यावेळी विभाग क्रमांक 1चे विभागप्रमुख विलास पोतनीस,मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे,महिला विभागसंघटक रश्मी भोसले स्थानिक नगरसेवक हर्षद कारकर,नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद,नगरसेविका सुजाता पाटेकर,नगरसेविका माधुरी भोईर आणि शिवसैनिक उपस्थित होते.
 दहिसर (पूर्व) प्रभाग क्रमांक 6 चे शिवसेना नगरसेवक हर्षद कारकर यांच्या वॉर्ड मधील मराठा कॉलनीमधील गेली  ६० वर्षे असलेल्या मराठी माणसांच्या अधिकृत बांधकामावर आर उत्तरच्या सहाय्यक पालिका आयुक्त  संध्या नांदेडकर यांनी 26 डिसेंबर रोजी ही निष्कलनाची कारवाई केली.
 एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर 11 व्या दिवशी तीच्याकडे पुरावे असतांना नादेडकर यांनी पोलिस फाटा घेऊन ही निर्दयी आणि माणुसकीला काळिमा घालणारी कारवाई केली,अशी संतप्त प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.
 या मनमानी सहाय्यक पालिका आयुक्त विरोधात शिवसैनिकांनी आज जोरदार निदर्शने केल्यानंतर नांदेडकर यांनी चूकीच्या कारवाईबद्दल नागरिकांची माफी मागितली व बांधकाम महापालिकेच्यावतीने पुन्हा बांधून देण्याची तयारी दर्शविली अशी माहिती त्यांनी दिली.या मुजोर सहाय्यक पालिका अधिकाऱ्यां विरोधात कारवाई करण्याची मागणी आपण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली असून सभागृहात आवाज उठवणार असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.
 

Web Title: The widow of Dahisar broke the house of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.