Why are not the photos of President and Prime Minister at the official office of Kalyan taluka? | कल्याण तालुक्याच्या शासकीय कार्यालयात राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो का नाहीत?

ठळक मुद्देभाजपाचे शशिकांत कांबळे यांनी केली पाहणी तहसीलदारांना पाठवणार पत्र

डोंबिवली: राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यासंदर्भातला अध्यादेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही असे नीदर्शनास आल्याची माहिती भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी सांगितले. त्यानूसार त्या प्रतिमा लावण्यात याव्यात यासंदर्भात तहसीलदार अमित सानप याना पत्र पाठवणार असल्याचे ते म्हणाले.
कांबळेंसह पक्षाच्या पूर्व मंडलाचे सरचिटणीस राजू शेख, चंदू पगारे, दिनेश दुबे, रवी ठाकूर आदींसह कार्यकर्त्यांनी कल्याण तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयांची पाहणी केली होती. त्या पाहणीत त्यांच्या या बाबी नीदर्शनास आल्याने त्यांनी ठिकठिकाणच्या अधिका-यांशीही चर्चा केली. डोंबिवलीतील विविध शासकीय कार्यालयांपैकी अभावानेच त्या अध्यादेशाचे पालन होत असल्याचे कांबळे म्हणाले. सर्वच कार्यालयांमध्ये त्याचे पालन व्हावे असा आग्रह धरणार असल्याचे ते म्हणाले. जेणेकरुन भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा सन्मान आपोआपच राखला जाईल. शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांसह विविध मान्यवर व्यक्तिंचा राबता असतो, त्यांच्याही नीदर्शनास असे बदल येतात, त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रप्रेम, राष्ट्रियत्वाची भावना वाढीस लागण्यासाठीही प्रयत्न होतो असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व तहसीलदार अमित सानप यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.