कल्याणमध्ये दोन मुलींना रेल्वे स्थानकात बेवारस सोडून जाणारा 'तो' निर्दयी बाप कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 02:39 PM2018-02-26T14:39:58+5:302018-02-26T14:39:58+5:30

कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो.

Who is the 'ruthless' father of two girls in Kalyan leaving alone in the railway station? | कल्याणमध्ये दोन मुलींना रेल्वे स्थानकात बेवारस सोडून जाणारा 'तो' निर्दयी बाप कोण ?

कल्याणमध्ये दोन मुलींना रेल्वे स्थानकात बेवारस सोडून जाणारा 'तो' निर्दयी बाप कोण ?

Next

कल्याण- कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो. त्यापैकी एकी मुलीचे वय अवघे दोन वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे. सुदैवाने या दोन्ही मुली रेल्वे पोलिसांच्या हाती लागतात. तेव्हा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जाते.

फूटेजमधील इसमाचा फोटा पाहून मुली पापा पापा असे बोलतात. तेव्हा पोलीस गोंधळून जातात. त्या मुलींना सोडणारा अज्ञात इसम आहे की त्या मुलींचा बापच त्यांना सोडून गेला आहे. हा प्रकार पाहून पोलिससुद्धा अवाक् होतात. त्यांच्याकडून तपास सुरु करण्यात आला आहे. मुली पोलिसांच्या ताब्यात सुखरुप आहेत. पोलीस त्या मुलींची काळजी घेत आहे. काय असे घडले असेल त्या इसमाने त्या लहानग्या मुलींनी रेल्वे स्थानकात सोडून जाण्याची वेळ त्याच्यावर आली असावी. मुलगी हवी. मुलगी वाचवा, बेटी बचाव अशा नारा सगळीकडे दिला जातो. आजही मुलींचा दुस्वास आणि तिरस्कार समाजात पाहायावस मिळतो.

कदाचित हे एक कारण त्या मुलींना रेल्वे स्थानकातील फटालावर सोडून जाण्यात असू शकते. मुली रात्री दीड वाजता पोलिसांनी फलाटावर एकट्या मिळून आल्या. रेल्वे स्थानकातील येणा-या गाडय़ांमुळे मुलीचा अपघात झाला असता. कोणी त्याना उचलून घेऊन गेले असते. त्यांना भिकेच्या धंद्याला लावले असते किंवा विकून दिले असते अशा एक ना अनेक शक्यता त्या मुलींच्या जिविताशी घडल्या असता. मात्र पोलिसांच्या कस्टडीत त्या असल्याने त्या सुरक्षित आहे. पोलीस मुलींना सोडून जाणा-या इसमाचा शोध घेत आहे. त्याचा पत्ता लागल्यावरच या मुलींना त्याने का सोडले. त्यामागचे कारण काय. तो खरच त्या मुलींचा बाप आहे की नाही हे उघड होणार आहे. काही असले तरी माणुसकीला काळिमा फासणारी घटना ऐकून सगळ्यांचेच मन हेलावून टाकणारी आहे. 

Web Title: Who is the 'ruthless' father of two girls in Kalyan leaving alone in the railway station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण