पाण्याची वणवण थांबली, शिक्षकाचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:37 AM2017-12-01T06:37:20+5:302017-12-01T06:37:25+5:30

रवर्षी पाणी टंचाई चे चटके सोसणाºया तालुक्यातील दापटी गावामध्ये सध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण मुंबईतील एका व्यावसायिकाने गावात टाकी लावली असून उंचावर असणा-या या गावामध्ये पाणी पोहचवण्याकामी स्व:खर्चाने पाईपलाईन टाकली आहे.

 The waterfall stopped, the teacher's follow up | पाण्याची वणवण थांबली, शिक्षकाचा पाठपुरावा

पाण्याची वणवण थांबली, शिक्षकाचा पाठपुरावा

Next

जव्हार : दरवर्षी पाणी टंचाई चे चटके सोसणाºया तालुक्यातील दापटी गावामध्ये सध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण मुंबईतील एका व्यावसायिकाने गावात टाकी लावली असून उंचावर असणा-या या गावामध्ये पाणी पोहचवण्याकामी स्व:खर्चाने पाईपलाईन टाकली आहे.
तालुक्यातील पाणी टंचाई असलेले दापटी गाव पावसाळा लागला कि दापटी गावात पाणी टंचाईला सुरवात होते. मात्र मुंबई येथील व्यावसायिकाच्या मद्दतीने दापटी गावातील पाणी टंचाई दूर झाली आहे.
पाणी टंचाईची स्थिती उन्हाळ्यात भिषण होते. महिलांना व लहानग्यानां त्यासाठी लाबंचलांब भटकावे लागते. ही परीस्थिती येथील शिक्षक कृष्णा मुरमे यांनी मुुंंबई येथील व्यावसायिक पुरु षोत्तम बंका यांच्या लक्षात आणून दिली. वर्षानुवर्षांची पाण्याची समस्या बºयापैकी सुटल्याने गावकºयांनी त्यांचे आभार मानले.
त्याच बरोबर येथे वस्तीला येणाºया एसटी बसचे चालक व वाहक व प्रवाशांसाठी पाणपोईची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. नव्याने टाकलेल्या पाईपलाईनमुळे गावात मुबलक पाणी आल्याने गावाच्या परिसरात आंबा, फणसाच्या कलमांची लागवड करण्याचा मानस गावकºयांनी व्यक्त केला आहे.

समाजोपयोगी कामांची रीघ
बंका यांच्या मदत निधीतुन दापटी, माळघर, खंडीपाडा, जामसर, डेंगाची मेट अशा विविध ठिकाणी समाजोपयोगी कामे झाली आहेत. यामध्ये बालमित्र वाचनालय असे अनेक उपक्र म त्यांच्या मद्दतीने पुर्ण झाले आहेत.

Web Title:  The waterfall stopped, the teacher's follow up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.