ठाण्यात दोन सावत्र मुलींवर पित्याचा लैंगिक अत्याचार: श्रीनगर भागातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 08:37 PM2018-03-05T20:37:18+5:302018-03-05T20:37:18+5:30

ठार मारण्याची धमकी देत आपल्याच सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधम पित्याविरुद्ध त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.

Two step daughters sexually expoits by father in Thane, Shrinagar area | ठाण्यात दोन सावत्र मुलींवर पित्याचा लैंगिक अत्याचार: श्रीनगर भागातील प्रकार

श्रीनगर भागातील प्रकार

Next
ठळक मुद्देवाच्यता केली तर ठार मारण्याची धमकीमोठया मुलीवर दोन वर्षांपूर्वी आता लहानीवरही केला अत्याचार संतप्त पत्नीने दिली पतीविरुद्ध तक्रार

ठाणे : स्वत:च्याच दोन सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-या पित्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्याविरुद्ध पत्नी गुन्हा दाखल करणार असल्याची कुणकुण लागताच तो पसार झाला आहे.
आपल्याच पंधरावर्षीय मुलीच्या अज्ञानाचा आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेऊन वागळे इस्टेट, श्रीनगर भागात राहणाºया कारचालकाने २ मार्च २०१८ रोजी आपल्या दुस-या पत्नीच्या मुलीला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आइस्क्रीम देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. तिला हिल ब्रिज श्रीनगर येथून नाशिक बाजूकडील हायवेवर एका निर्जनस्थळी नेऊन कार रस्त्याच्या कडेला उभी केली. नंतर, तिला जबरदस्तीने बीअर पिण्यास भाग पाडून तिचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने घरी जाण्याचा तगादा लावल्यानंतर याबाबतची वाच्यता केल्यास तुला संपवून टाकेन, अशीही धमकी त्याने दिली. ३ मार्च रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत तो तिच्याशी हे चाळे करत होता. घरी परतल्यानंतर आईला तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. २०१४ मध्ये याच मुलीच्या अठरावर्षीय मोठ्या बहिणीवरही त्याने श्रीनगर भागात लैंगिक अत्याचार केला होता. मात्र, त्या प्रकारानंतर तरी त्याच्यात सुधारणा होईल, अशी पत्नीला अपेक्षा असतानाच त्याने दुस-या मुलीचाही तशाच प्रकारे लैंगिक छळ केल्यानंतर संतप्त झालेल्या या मुलींच्या आईने (आरोपीची दुसरी पत्नी) श्रीनगर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी रात्री तक्रार दाखल केली आहे. आरोपीची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.

Web Title: Two step daughters sexually expoits by father in Thane, Shrinagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.