टीएमटीच्या ९ व्होल्वो बस १५ दिवसापासून दुरुस्तीसाठी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:27 PM2018-12-12T23:27:58+5:302018-12-12T23:28:16+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असणाऱ्या ३० पैकी ९ व्होल्वो बस १५ दिवसांपासून वागळे आगारात दुरुस्तीसाठी उभ्या आहेत.

TMT's 9VOLO bus is dust for repair by 15 days | टीएमटीच्या ९ व्होल्वो बस १५ दिवसापासून दुरुस्तीसाठी धूळखात

टीएमटीच्या ९ व्होल्वो बस १५ दिवसापासून दुरुस्तीसाठी धूळखात

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असणाऱ्या ३० पैकी ९ व्होल्वो बस १५ दिवसांपासून वागळे आगारात दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. त्यामुळे दिवसाला परिवहन सेवेचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान होत आहे. त्या रस्त्यावर उतरण्यास आणखीन आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. मात्र, तरीही प्रशासन बेफिकीर दिसत आहे.

सध्या ठाणे ते बोरीवली या मार्गावरील वातानुकुलीत ही बस सेवा सुरू आहे. यातील एका बसचे सरासरी दिवसाचे उत्पन्न हे १० हजारांच्या आसपास आहे. या मार्गावर २६ वातानुकुलीत बस धावतात त्याव्यतिरिक्त ४ व्होल्वो बस ठाणे ते मंत्रालय अशा धावत आहेत. ठाणे ते बोरीवली मार्गावर त्या वाढवाव्यात अशी या मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे.

असे असतांना मागील १५ दिवसांपासून केवळ २१ बसच रस्त्यावर धावत असून उर्वरीत ९ बस वागळे आगारात दुरुस्ती उभ्या आहेत. त्यापैकी काही बसच्या काचा फुटल्या असून काही सर्व्हिसिंगसाठी उभ्या आहेत. परिणामी त्या रस्तावर धावत नसल्याने दिवसाला सुमारे एक लाखांचे नुकसान होत आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात जवळपास १५ लाखांचे नुकसान परिवहनला सहन करावे लागले आहे.

Web Title: TMT's 9VOLO bus is dust for repair by 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.