जीवन प्राधिकरणाच्या आशीर्वादाने टँकर माफियांची चांदी, काँग्रेस शहर अध्यक्षांनी उघड केला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 07:15 PM2018-01-07T19:15:04+5:302018-01-07T19:15:49+5:30

अंबरनाथमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टँकर लॉबीची चांगलीच युती झालेली आहे. 100 ते 200 रुपये जीवन प्राधिकरणाला भरून टँकर चालक संपूर्ण टँकर पाण्याने भरून त्या टँकरची विक्री तीन हजार रुपयांमध्ये करीत आहे.

Tinker Mafia's silver, blessings of Life Authority | जीवन प्राधिकरणाच्या आशीर्वादाने टँकर माफियांची चांदी, काँग्रेस शहर अध्यक्षांनी उघड केला प्रकार

जीवन प्राधिकरणाच्या आशीर्वादाने टँकर माफियांची चांदी, काँग्रेस शहर अध्यक्षांनी उघड केला प्रकार

Next

अंबरनाथ : अंबरनाथमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टँकर लॉबीची चांगलीच युती झालेली आहे. 100 ते 200 रुपये जीवन प्राधिकरणाला टँकर चालक संपूर्ण टँकर पाण्याने भरून त्या टँकरची विक्री तीन हजार रुपयांमध्ये करीत आहे. हा प्रकार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनीच उघड केला असून, त्यांनी या टँकर माफियांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पाटील यांनी हा प्रकार उघड केल्यावर लागलीच टँकच चालकांना जीवन प्राधिकरणाने पाणी देणे बंद केले आहे.

अंबरनाथची टँकर लॉबी ही जीवन प्राधिकरणाला अंधारात ठेवत मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. जीवन प्राधिकरणाच्या पश्चिम भागातील कार्यालयासमोरून पाणी भरून ते पाणी शहरातील सोसायटींना विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. जीवन प्राधिकरणाला 4 हजार लिटरच्या टँकरसाठी 100 रुपये तर 8 हजाराच्या टँकरसाठी 200 रुपये भरत आहे. हे भरलेले टँकर शहरातील सोसायटींना तब्बल 2 ते 3 हजारांत विकण्याचे काम करीत आहेत.

जीवन प्राधिकरणाला या पाण्याच्या मोबदल्यात केवळ 100 रुपये मिळत आहे, तर टँकर मालक प्रत्येक टँकरमागे दीड ते दोन हजार रुपये कमावित आहे. एवढेच नव्हे तर जीवन प्राधिकरणाची जबाबदारी ही सर्व शहराला पाणीपुरवठा करण्याची आहे. त्यातही ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागापुरती पाण्याचे टँकर माफक दरात देणे गरजेचे आहे. मात्र टँकर मालकांनी पाण्याचा मोठा व्यापार तयार केला असून, दररोज एक टँकर पाच ते सहा फे-या मारून मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यवसाय करीत आहेत. अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा अनियमित होत असताना टँकर चालकांना मात्र मुबलक पाणी दिले जात आहे.

पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असताना टँकर चालकांना मात्र कसे पाणी दिले जाते, याची विचारणा प्रदीप पाटील यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी टँकरला पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट दिली असता 8 ते 10 टँकर हे पाण्याच्या रांगेत उभे होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकरला पाणी दिले जात असल्याने त्यांनी या प्रकरणाला आक्षेप घेत अधिका-यांना जाब विचारला. ही बाब वरिष्ठ अधिका-यांना कळताच त्यांनी देखील टँकरचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

अंबरनाथ शहराला एमआयडीसी, बॅरेज आणि एमजीपी यांच्याकडून एकूण 62 एमएमडी पाणी पुरवठा करण्यात येत असतो. मात्र शहरात वाढते गृह प्रकल्प आणि त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या यामुळे शहरात पाण्याची मोठी मागणी वाढत आहे. त्यामुळे शहरात एकीकडे 72 कोटी रूपयांचा वाढीव पाणी पुरवठा योजनाही शासकीय लाल फीतीच्या कारभारात खोळंबली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना आज पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र एकीकडे अपु-या पाणी पुरवठयाचे कारण नागरीकांना एमजीपी देत असली तरी शहरात टँकल लॉबीला मात्र एमजीपीकडून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत असतो. अंबरनाथ पश्चिम भागातील एमजीपीच्या बुस्टींग पंपिंग स्टेशनमध्ये 2 लाख 72 हजार लिटर पाण्याचा साठा करण्यात येत असतो. याच केंद्रातून शहरातील पश्चिम भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र शहरात एकीकडे अनेक भाग पाणी टंचाईने त्नस्त असतांना, या एमजीपीच्या बुस्टींग पंपिग केंद्रातून दिवसाला 50 खासगी टँकरला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. त्यामुळे एकीकडे शहरातील अनेक रहिवासी भाग पाणीटंचाईने त्रस्त असताना नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा सुरू असलेला बाजार टँकर लॉबीला सदन करण्याचा प्रकार असून, नागरिकांच्या हक्काचे पाणी बांधकाम व्यावसायिकांना पुरवले जात आहे.

मात्र शहरातील काही बड्या राजकीय व्यक्तींचे हे सर्व टँकर असल्याने या विरोधात कुणी आवाज उठवत नहीत. माष पाटील यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याने टँकर लॉबीला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अधिका-यांना विचारणा केली असता तक्रार येताच टँकरनं पाणीपुरवठा बंद केल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Tinker Mafia's silver, blessings of Life Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.