तीन वाहनांची एकमेकांना धडक; तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:31 AM2019-05-30T01:31:24+5:302019-05-30T01:31:27+5:30

येथील बायपास तसेच नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने तिघे जखमी झाले.

 Three vehicles hit each other; Three people injured | तीन वाहनांची एकमेकांना धडक; तीन जण जखमी

तीन वाहनांची एकमेकांना धडक; तीन जण जखमी

Next

मुंब्रा : येथील बायपास तसेच नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने तिघे जखमी झाले. बायपास रस्त्यावरून पनवेलच्या दिशेने चाललेल्या ट्रकने पिकअपला आणि पिकअपने दुचाकी चालकाला धडक दिली. यामुळे संतुलन बिघडल्याने दुचाकीचालक शमशाद आलम रस्त्याच्या खालच्या बाजूला पडल्याने तर पिकअपमध्ये अडकल्यामुळे नीरज यादव हा चालक जखमी झाला.
बायपासजवळील रहिवाशांनी दरवाजा तोडून त्याला केबिनच्या बाहेर काढले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. दुसरी घटना अमृतनगर भागातील रस्त्यावर घडली. यात कारने मागून धडक दिल्याने खाली पडून दुचाकीचालकाच्या हाताचे बोट जायबंदी झाले.

Web Title:  Three vehicles hit each other; Three people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.