बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या तिघांना उल्हासनगरात बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 07:20 PM2018-02-16T19:20:27+5:302018-02-16T19:20:57+5:30

बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Three of the three who came to sell leopard skins are bound in Ulhasanagar | बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या तिघांना उल्हासनगरात बेड्या

बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या तिघांना उल्हासनगरात बेड्या

Next

 उल्हासनगर - बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बिबटयाच्या कातडीची किंमत १० लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ संच्युरी रेयॉन कंपणीच्या विश्रामगृहाकडील मुरबाड रस्त्यावर बिबटयाची कातडी विकण्यासाठी त्रिकूट येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला खब-या कडून मिळाली. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सेच्युरी कंपणी मुरबाड रस्त्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान टाटा नॅनो गाडीतून तिघे जण उतरून, रस्त्यांनी जात होते. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्यावर, त्यांना अडवून अंगझडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडील प्लॉस्टिकच्या बॅगेत बिबटयांची सुकविलेली कातडी आढळून आली.
उल्हासनगर गुन्हे शाखेचे प्रमुख मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक उरद्दीन शेख, युवराज मागुडे, पोलिस उपनिरिक्षक गणेश तोरमल, रामसिंग चव्हाण, सुरेश पवार आदीच्या पथकांने प्रमोद पवार, अनिल खैरनार व राकेश निकम  यांना अटक करून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अटक केलेले त्रिकुट मुळ नाशिक जिल्हातील राहणारे असून, कोण्या गँगशी अथवा वन्य प्राणी हत्या करणारी टोळीसी संबधीत आहे का?. आदी तपास उल्हासनगर पोलिस करणार आहे. त्रिकुटाला न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच  पोलिसांनी नाटा नॅनो गाडीसह मोबाईल व १० लाख किमतीची बिबटयाची सुकवलेली कातडी जप्त केली. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Three of the three who came to sell leopard skins are bound in Ulhasanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.