‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:48 AM2017-12-08T00:48:45+5:302017-12-08T00:49:01+5:30

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही

Three days of 'Gadkari' report | ‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस

‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही, छत पूर्णपणे काढून दुसरे बसवण्याची गरज आहे का, आदींसह इतर बाबींचा अभ्यास तांत्रिक अहवालाच्या माध्यमातून केला जात आहे. तो येण्यास आणखी तीन दिवस जाणार असल्याने तीन दिवस तरी गडकरीचा पडदा उघडला जाणार नाही. त्यामुळे या काळात होणारे प्रयोग रद्द केले आहेत.
या इमारतीचे आयुर्मान तपासण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिटचे कामही सुरू झाले होते. परंतु, त्या आधीच ही घटना घडली. त्यामुळे आता ते कामही अर्धवट राहिले आहे. आता येत्या दोन ते तीन दिवसांत त्याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती नगर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी येथे दोन प्रयोग होते, तर शुक्रवारीदेखील एकांकिका स्पर्धा आणि एक नाट्यप्रयोग होता. आता तोदेखील रद्द करण्यात आला आहे.
संपूर्ण रंगायतनवरच छत टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यावर साडेतीन कोटींचा खर्च केला जाणार आहे.

पुन्हा १४ मार्च १९९९ रोजी त्याचे नूतनीकरण करण्यात येऊन त्याचे उद्घाटनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्याची आसनक्षमता ९६२ एवढी आहे. रोज येथे नाटक अथवा इतर साधारणपणे चार प्रयोग होत असतात. १९७८ पासून हे नाट्यगृह ठाण्याची शान राखून आहे. परंतु, आता ते अधिक धोकादायक होऊ नये आणि पाण्याच्या माºयामुळे त्याचे आयुर्मान कमी होऊ नये, यासाठी संपूर्ण रंगायतनवरच छत टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्या आशयाचा प्रस्ताव मंजूर झाला असून सुमारे साडेतीन कोटींचा खर्च यासाठी केला जाणार आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून या इमारतीचे आयुर्मान तपासण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिटचे कामही सुरू झाले होते. परंतु, त्या आधीच ही घटना घडली. त्यामुळे आता ते कामही अर्धवट राहिले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती नगर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी येथे दोन प्रयोग होते, तर शुक्रवारीदेखील एकांकिका स्पर्धा आणि एक नाट्यप्रयोग होता. आता तोदेखील रद्द करण्यात आला आहे.
 

Web Title: Three days of 'Gadkari' report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.