साडेचौदा हजार फायली अभिलेखात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:43 AM2017-11-08T01:43:10+5:302017-11-08T01:43:10+5:30

राज्य शासनाच्या ‘झीरो पेंडन्सी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये मागील काही वर्षांपासून पडून असलेल्या फायलींचा

Thirty and threescore files are filed in the archives | साडेचौदा हजार फायली अभिलेखात दाखल

साडेचौदा हजार फायली अभिलेखात दाखल

Next

ठाणे : राज्य शासनाच्या ‘झीरो पेंडन्सी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये मागील काही वर्षांपासून पडून असलेल्या फायलींचा निपटारा करण्यात आला. त्यातील १४ हजार ५५४ फायलींचा महत्त्वपूर्ण कार्यालयीन दस्तऐवज अभिलेखा कक्षात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या दस्तऐवजांसह आता २५ हजार महत्त्वाच्या फायलींच्या दस्तऐवजाचे अद्ययावत पद्धतीने जतन करण्यात आले आहे.
कार्यालयीन दस्तऐवज आता अद्ययावत करण्याचा उपक्रम जि.प.च्या सर्वच विभागांमध्ये सुरू आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या सूचनांनुसार ‘अभिलेख वर्गीकरणाचे काम अधिकाºयांसह कर्मचारी जोरदारपणे करत आहेत. यामुळे ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ अर्थात ‘शून्य प्रलंबितता आणि दैनिक निर्गती’ या कार्यालयीन पद्धतीचा अवलंब अधिकारी व कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. १० नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम जि.प.सह पंचायत समित्यांमध्ये राबवण्यात येत आहे.
या दस्तऐवजांमध्ये ‘अ’ श्रेणीचे दस्तऐवज कायमस्वरूपी आहेत. तर, बी श्रेणीचे ३० वर्षे कालावधीचे दस्तऐवज असून ‘क’ श्रेणीचे १० वर्षांसाठीचे दस्तऐवज आहेत. याशिवाय, ‘क-१’ श्रेणीचे दस्तऐवज पाच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे. तर, ‘ड’ श्रेणीच्या दस्तऐवजाचा म्हणजे फायलीचा निर्णय एका वर्षात लावून ते फाडून टाकण्याचे काम कर्मचारी करत आहेत. वर्षानुवर्षांपासून जि.प. व पं.स.मध्ये अभिलेख साठलेला आहे.

Web Title: Thirty and threescore files are filed in the archives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.