Third front of the builders of Thane, slum areas are redeveloped | ठाण्यात बिल्डरांची तिसरी आघाडी, झोपडपट्टी पुनर्विकासावरून बिनसले
ठाण्यात बिल्डरांची तिसरी आघाडी, झोपडपट्टी पुनर्विकासावरून बिनसले

ठाणे : कित्येक वर्षे एकोप्याने वावरणा-या ठाण्यातील विकासकांमध्येदेखील आता ठिणग्या पडू लागल्या आहेत. सुरुवातीला एकसंध असलेल्या संघटनेत आता उभी फाटाफूट होऊ लागली आहे. त्यामुळेच आधी द्विभाजन झाल्यानंतर या संघटनेत आणखी एक मोठी ठिणगी पडली असून येत्या काही दिवसांत ‘सरडा’ नावाची तिसरी संघटना आकाराला येत आहे. त्यात सात महापालिकांमध्ये स्लम डेव्हलपमेंट (झोपडुपट्टी पुनर्विकास) करणाºया विकासकांचा समावेश असेल. मूळ संघटनेत फूट पडू नये, यासाठी अनेकांनी शर्र्थीचे प्रयत्न केले. परंतु, काही विकासकांच्या हट्टापायी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात सध्या विकासाला वेग आल्याने स्वाभाविकपणे तो बांधकाम व्यावसायिकांवर केंद्रित झाला आहे. सुरुवातीला येथील स्थानिकच बिल्डर बनले होते. कालांतराने बाहेरील विकासकांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यानुसार, सुमारे २० वर्षांपूर्वी काही दिग्गज विकासकांनी एकत्र येऊन असोसिएशनची स्थापना केली होती. त्यानंतर, १७ वर्षांपूर्वी एमसीएचआयची स्थापना करण्यात आली. आता याच एमसीएचआयचे सतरावे प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात सध्या ७५० च्या आसपास विकासकांचा समावेश आहे. यातूनच त्या संघटनेचा विसातर लक्षात यावा.
परंतु, ठरावीक विकासकांच्या मनमानीमुळे यातून मोठ्या बिल्डरांनी काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली होती. पुढे यात आणखी ठिणग्या पडू लागल्या. शाब्दिकबाचाबाची आणि इतरही काही खटके उडू लागले. त्यातूनच काही महिन्यांपूर्वी ‘नरेडको’ ही आणखी एक संघटना पुढे आली. यामध्ये एमसीएचआयमध्ये असलेल्या परंतु आता काडीमोड झालेल्यांचाच समावेश असल्याचे दिसून आले. या संघटनेच्या प्रदर्शनातदेखील एमएमआरडीए परिसरातील विकासकांचा समावेश आहे. ठाण्यातील विकासकांमध्ये पडलेली ही पहिली ठिणगी असल्याचे बोलले जाते. आता यापेक्षाही मोठी ठिणगी येत्या काही दिवसांत पडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सात महापालिकांत स्लम डेव्हलपमेंट करणारे विकासक एकत्र आले असून त्यांनी ‘सरडा’ नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची तारीख शनिवारी निश्चित होणार आहे.
ते पाहता राजकारणात जशी वेगवेगळ््या विचारसरणीच्या पक्षांची एकेक आघाडी असते, तशी ठाण्यातील बिल्डरांचीही तिसरी आघाडी होणार हे निश्चित मानले जाते. ही संघटना नरेडकोमध्ये समाविष्ट करण्यासाठी, त्याचाच भाग व्हावा यासाठी काही विकासकांनी मध्यस्थीदेखील करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, केवळ पैशांच्या खेळासाठी आम्ही सहभागी का व्हायचे, असा सवाल करून या संघटनेतील पदाधिकाºयांनी याला विरोध दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही विकासकांनी यंदा एमसीएचआयच्या प्रदर्शनातूनदेखील काढता पाय घेतल्याची माहिती आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून केवळ साध्या विकासकांच्या खिशाला चाप बसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या संघटनेतूनच बाहेर पडून ही वेगळी चूल मांडण्याचा निर्णय झाला आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे स्लम डेव्हलपमेंट क्षेत्रातील विकासक हे स्लम आणि इतर कमर्शिअल इमारतीदेखील बांधू शकतात. परंतु, इतर विकासक मात्र अशा पद्धतीने काम करण्यास तयार नसल्याने यातूनच ही दुफळी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही दरी वाढत जाऊन विकासकांची तिसरी आघाडी ‘सरडा’च्या निमित्ताने प्रत्यक्षात येत आहे.

व्यवसायात मंदी की सूज उतरली?
बांधकाम व्यवसायात सध्या मंदी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जीएसटीत सवलत देणे, काही करांत सलवत देणे, स्वत:चे कर्जाचा पुरवठा करणे, काही वस्तू फुकट देणे असे मार्ग बिल्डर अवलंबत आहे.
पण घरांच्या किंमती कमी करण्यास बिल्डर तयार नाहीत. त्यामुळे व्यवसायात खरोखरीच मंदी आहे, की फुगवून सांगितलेल्या किंमतींमुळे दरात आलेली सूज उतरण्याचा काळ सुरू आला आहे, याबाबत मतभेद आहेत.


नव्या संघटनेबाबत पहिली बैठक झाली असून दुसरी बैठक शनिवारी होणार आहे. मुंबईत अशाप्रकारे वेगळी संघटना आहे. त्यामुळे आता ठाण्यातही तशी संघटना असावी, या उद्देशाने आम्ही ती सुरूकरत आहोत.
- अनिल सिंग, विकासक, सरडा संघटना सदस्य


Web Title: Third front of the builders of Thane, slum areas are redeveloped
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.