ठाण्याच्या समतानगर येथील दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलसह सीसीटीव्हीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:58 PM2019-01-31T21:58:48+5:302019-01-31T22:04:42+5:30

वर्तकनगर येथील गजबजलेल्या समतानगर भागातील एका इलेक्ट्रानिक वस्तू विक्रीच्या दुमजली दुकानातून चोरटयांनी टेरेसवरुन प्रवेश करुन दुकानातील ५० मोबाईल आणि रोकडसह १५ लाखांच्या सामानांची चोरी केली. या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Theft of 15 lakhs Electronic article from the shop in Samatanagar, Thane | ठाण्याच्या समतानगर येथील दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलसह सीसीटीव्हीची चोरी

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्दे ५० मोबाईलसह अनेक इलेक्ट्रीक वस्तूंची चोरीदुकानाच्या टेरेसवरुन केला शिरकाववर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : वर्तकनगरपासून जवळच असलेल्या समतानगर या गजबजलेल्या भागातील जैन ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दुकानातून सुमारे १५ लाख २७ हजारांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दुकानाचे मालक धीरज जैन (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवदया पार्क येथे त्यांचे जैन ट्रेडर्स हे इलेक्ट्रॉनिक वस्तूविक्रीचे दोन मजली शोरूम आहे. दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर दुकानातील साहित्य ठेवण्यासाठी एक गोदाम केलेले आहे. २९ जानेवारी रोजी रात्री ९.४० ते ३० जानेवारी रोजी सकाळी १० वा.च्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या बंद टेरेसच्या आणि जिन्याच्या दरवाजाचे कुलूप तसेच दरवाजाच्या बिजागºया तोडून तळ मजल्यावरील दुकानातील एका नामांकित कंपनीचे आठ लाख ७० हजारांचे ३९ मोबाइल, अन्य एका कंपनीचे एक लाख ७० हजारांचे १२ मोबाइल असे सुमारे ५० मोबाइल तसेच एक लाखाचे वेगवेगळ्या कंपन्यांचे चार्जर, १० हजारांचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन आणि ४० हजारांची रोकड अशा १५ लाख २७ हजार १०० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रोकड चोरली आहे. जाताना दुकानातील १२ सीसीटीव्हींच्या कॅमेºयांच्या वायरचेही त्यांनी नुकसान केले. दुकान आणि परिसरात सुरक्षेसाठी १४ सीसीटीव्ही लावलेले आहेत. तरीही, नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील या दुकानातून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
.......................
अशी केली चोरी
जैन ट्रेडर्स या दुकानात तळ मजल्यावर विक्रीसाठीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. पहिल्या माळ्यावरील सीसीटीव्ही कॅमे-यांची तोडफोड करून डीव्हीआरही लंपास केला. टेरेसकडे जाणा-या जिन्याच्या दरवाजाचे लॅच आतील बाजूने तोडून दरवाजा उघडण्यात आला होता. दुस-या माळ्यावरील टेरेसच्या दरवाजाच्या फ्रेमच्या बिजाग-या उचकटून दरवाजा तोडण्यात आला होता. त्यामुळे चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूने येऊन टेरेसवरील दरवाजाने दुकानात शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांतील वर्तकनगर भागातील ही मोठी चोरी असल्याचे बोलले जात आहे.
.......................
दोन पथके
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी या चोरीच्या तपासासाठी दोन पथकांची निर्मिती केली आहे, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडूनही या चोरीचा समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Theft of 15 lakhs Electronic article from the shop in Samatanagar, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.