काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी सरकारने धुवून काढले - चंद्रशेखर बावनकुळे 

By नितीन पंडित | Published: October 28, 2023 05:29 PM2023-10-28T17:29:32+5:302023-10-28T17:30:01+5:30

या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

The sins of 65 years of the Congress era were washed away by the Modi government - Chandrasekhar Bawankule | काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी सरकारने धुवून काढले - चंद्रशेखर बावनकुळे 

काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी सरकारने धुवून काढले - चंद्रशेखर बावनकुळे 

नितीन पंडित

भिवंडी : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकी साठी कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघ निहाय महाविजय २०२४ संकल्प दौरा कार्यक्रम राबविला जात असून यानिमित्त आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात व जल्लोषात स्वागत केला.
 
या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोपर ,पूर्णा येथेही बावनकुळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनतर शहरातील पद्मानगर भाजी मार्केट येथील भाजी व फळ विक्रेते, किराणा दुकानदार, उज्वला गॅस योजना, नाका कामगार, आयुष्यमान भारत, स्वनिधी लाभार्थी, मोफत धान्य मिळणारे लाभार्थी यांच्याशी संवाद साधत त्यांना २०२४ मध्ये प्रधानमंत्री कोण हवेत, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली. 

या संवाद यात्रेचा समारोप पद्मानगर संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेर झालेल्या सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंडिया आघाडीवर टिका करत मुंबई येथे २८ पक्षांच्या इंडिया आघाडीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सभेवर देखील टिका करत राज्यात मोदी यांच्या नेतृत्वाला भरघोस प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये भिवंडी लोकसभेमधील संवाद यात्रा ही २३ वी आहे, असे सांगत भिवंडीत ८१४ तर राज्यात तब्बल ३५ हजार नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये फक्त १३ जणांनी मोदी व्यतिरिक्त इतर व्यक्तीचे नाव घेतले, अशी माहिती दिली.

काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धुवून काढले असे सांगत देशाला विश्वात महeसत्ता बनविण्या साठी २०२४ मध्ये महाराष्ट्रात ४५ प्लस खासदार निवडून देण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी केले. तर या प्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिर दर्शनासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ५० हजार नागरिकांना घेवून जाण्याचा संकल्प बोलून दाखविला.
 

Web Title: The sins of 65 years of the Congress era were washed away by the Modi government - Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.