ठाण्यामुळे झाली मुलुंड संमेलनाची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:09 AM2018-05-23T03:09:50+5:302018-05-23T03:09:50+5:30

उस्मानाबादमध्ये झालेल्या नाट्यसंमेलनात मुलुंड शाखेने ९८ वे नाट्य संमेलन भरवण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता.

Thane was created due to Mulund Sammelan | ठाण्यामुळे झाली मुलुंड संमेलनाची नांदी

ठाण्यामुळे झाली मुलुंड संमेलनाची नांदी

Next


ठाणे : नाट्यसंमेलन भरवण्याचे अगोदर प्रस्ताव दिलेल्या नाशिक व जळगाव शाखांनी विलंब झाल्याने दिलेला नकार आणि मुलुंड शाखेचा प्रस्ताव नसतानाही आता तेथे संमेलन घेण्याचा घेतलेला निर्णय यावरुन नाट्यकर्मींमध्ये हे संमेलन घटनाबाह्य असल्याची कुजबुज सुरु होती. मात्र दोन वर्षांपूर्वी आयोजनाची तयारी दाखवणाऱ्या शाखांनी पसरी खाल्ल्यावर ऐनवेळी ठाण्यात मोठ्या दिमाखात संमेलन साजरे झाल्याने याच प्रथेनुसार ठाण्याच्या वेशीवर मुलुंडला यंदा १३ ते १५ जून दरम्यान संमेलन आयोजित केले आहे, असे नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
उस्मानाबादमध्ये झालेल्या नाट्यसंमेलनात मुलुंड शाखेने ९८ वे नाट्य संमेलन भरवण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. मात्र नाट्य परिषदेच्या २७ आॅक्टोबर २०१७ ला लागू झालेल्या नव्या घटनेनुसार १४ आॅगस्टपूर्वी रीतसर संमेलन भरवण्याचा प्रस्ताव शाखांनी पाठवणे बंधनकारक आहे. त्यातील एका ठिकाणी नाट्यसंमेलन भरवण्याची मान्यता नियामक मंडळ देते. प्रस्ताव पाठवलेल्या शाखांनी ऐनवेळी संमेलन भरविण्यास असमर्थता दर्शविल्यास नाट्यपरिषदेला संमेलन भरवण्याचे बंधन नसते.
नाट्यपरिषदेच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या. नवे नियामक मंडळ आणि कार्यकारिणी सत्तेवर आली. निवडणुकांमुळे लांबणीवर गेलेले संमेलन भरवणे नव्या कार्यकारिणीपुढे पहिला अजेंडा होता. त्यासाठी त्यांनी प्रस्ताव असलेल्या नाशिक आणि जळगाव शाखांकडे विचारणा केली. मात्र एकंदर प्रक्रियेला विलंब झाल्याने त्यांनी संमेलन भरवण्यास नकार दिल्याने, यंदा संमेलन भरवावे की भरवू नये असा पेच निर्माण झाला.
९६ व्या संमेलनासाठी प्रस्ताव पाठवणाºया शाखांनी वेगवेगळ््या कारणास्तव अशीच असमर्थता दर्शविली होती. ऐनवेळी ठाणे शाखेचा प्रस्ताव नसताना, संमेलन आयोजनाची जबाबदारी दिली गेली आणि दिमाखदार संमेलन संपन्न झाले. अशी आणखी काही उदाहरणे नाट्य परिषदेच्या इतिहासात असून, तीच प्रथा मुलुंडला संमेलनाचे आयोजन करण्यासाठी आधार ठरली आहे. त्यानुसार होणारे हे ९८वे संमेलन घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा पदाधिकाºयांनी दिला.

सरकारकडे एकही मागणी न करणारे हे पहिले संमेलन ठरेल
‘नाट्यपरिषदेचा कार्यभार हाती घेतल्यानंतर संमेलन भरवले नसते तर आमच्यावर टीका झाली असती, त्यामुळे घटनेनुसारच मुलुंडमधील संमेलन अत्यंत कमी वेळात आयोजित करीत आहोत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे असले तरी, सरकारकडे एकही मागणी न करणारे हे संमेलन ठरेल.’
-प्रसाद कांबळी, अध्यक्ष, नाट्य परिषद

Web Title: Thane was created due to Mulund Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Theatreनाटक