ठाण्यात महिलेची १२ लाखांची फसवणूक करुन ठार मारण्याची धमकी: पतीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 05:45 PM2017-12-13T17:45:51+5:302017-12-13T17:56:04+5:30

लग्नाच्या अमिषाने शारिरिक संबंध ठेवून गांधर्व विवाहानंतर महिलेकडून साडे बारा लाख रुपये हाडपणा-या कथित पतीविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. पैशांच्या तगाद्यानंतर त्याने तिला ठार मारण्याची धमकीही दिली.

 Thane Threats to Kill 12 Lakhs of Women: Crime Against Husband | ठाण्यात महिलेची १२ लाखांची फसवणूक करुन ठार मारण्याची धमकी: पतीविरुद्ध गुन्हा

पतीविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देलग्नाच्या अमिषाने आधी शारीरिक संबंध प्रस्थापितगांधर्व विवाहानंतर हाडपले साडे १२ लाख रुपयेपैशांच्या तगाद्यानंतर घरातून हाकलून ठार मारण्याची धमकी

ठाणे : एका ४७ वर्षीय महिलेशी शारीरिक संबंधानंतर गांधर्व पद्धतीने विवाह करुन साडे १२ लाखांची रक्कम हाडपली. नंतर मारहाण करुन तिला घराबाहेर काढणा-या रुपेश बिडीयारे (४०) याच्याविरुद्ध या महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.
पिडीत महिलेबरोबर रुपेशचे २००८ मध्ये प्रेमसंबंध होते. पुढे त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवित आपल्या जाळयात ओढले. त्यामुळे विवाहित असूनही तसेच त्याच्यापेक्षा वयाने मोठी असूनही ती त्याच्याकडे आकर्षित झाली. त्याच काळात त्याने तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. तिने लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने गांधर्व पद्धतीने एका मंदिरामध्ये तिच्याशी विवाह करुन तिची समजूत काढली. तिचा इस्टेट एजंटचा व्यवसाय असल्यामुळे तिच्याकडे ब-यापैकी पैसे असल्याचे त्याने हेरले. लग्नानंतर तिला विश्वासात घेत तिच्याकडील सुमारे १२ लाख ५० हजारांची रक्कम त्याने हडप केली. या पैशांची मागणी केल्यानंतर मात्र त्याने तिला मारहाण करीत शिवीगाळ केली. कहर म्हणजे तिला ठार मारण्याचीही त्याने धमकी. तिच्या रियल इस्टेट व्यवसायातील पैसेही त्याने हाडपले. शिवाय, तिच्या व्यवहारातील पैसे वापरुन तिचा रियल इस्टेटचा व्यवसाय देखिल ताब्यात घेतला. २००८ पासून २०१७ या नऊ वर्षांच्या काळात एकत्र राहूनही त्याने वेगवेगळया प्रकारे फसवणूक केल्यानंतर पुन्हा ठार मारण्याचीही धमकी दिल्याची तक्रार या महिलेने १२ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दाखल केली आहे. याप्रकरणी पैशांचा अपहार, फसवणूक, मारहाण तसेच शिवीगाळ केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीची चौकशी करण्यात येणार असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले. उपनिरीक्षक माधुरी घाडगे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Thane Threats to Kill 12 Lakhs of Women: Crime Against Husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.