ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटेआजोबानी वाढवला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:54 PM2019-05-04T15:54:27+5:302019-05-04T15:58:39+5:30

ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला संगीत कट्टा म्हणजे समस्त ठाणेकरांची पर्वणी ठरतोय .

Thane Senior Citizen increased the cost of entertainment for 92 years | ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटेआजोबानी वाढवला उत्साह

ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटेआजोबानी वाढवला उत्साह

Next
ठळक मुद्देजेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटे आजोबानी वाढवला उत्साह किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला संगीत कट्टा म्हणजे समस्त ठाणेकरांची पर्वणी ये शाम मस्तानी या शिर्षकाखाली या जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्याची सुरवात

ठाणे : गेल्या दोन वर्षात संगीत कट्ट्यावर विविध संगीतमय मैफिलींचा आस्वाद रसिकांना मिळतोय. ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर जेष्ठांची मैफिल रंगली व एकूण अठरा गायकांनी गाण्यांची उत्तम मेजवानी रसिकांना दिली. 

     ये शाम मस्तानी या शिर्षकाखाली या जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्याची सुरवात संदीप गुप्ता - फुलों को तारो का सबका कहना हे  , या भावा बहिणीच्या नाते संबंधावर आधारित गाण्यानं झाली .नंतर दिलीप नारखडे - जिंदगी का सफर ,प्रवीण शाह - गुलाबी ऑखें जो 'तेरी देखी ,वासुदेव फणसे - खोया खोया चांद , व्यंकटेश कुलकर्णी - जिस गली मी तेरा घर ना हो बालमा ,प्रभाकर केळकर - वो हे जरा खफा खफा,  मोरेश्वर ब्राम्हणे -वक्त करता जो वफा ,संजय देशपांडे -चौदहवी का चांद हो, - श्री दत्त पालखी ,माधवी जोशी - नाट्यपद देवमाणूस नाटकातील दिलदुवा ,विजया केळकर - क्या जानु सजन ,प्रगती पोवळे -तेरे प्यार का सागर ,चंद्रदास पटवर्धन -ये क्या हुआ , सुधाकर कुलकर्णी -सबकुछ सीका हमने ,धर्मसी भाटे -सहगल ची गाणी ,विष्णु डाकवले - सुहाना सफर ,सुप्रिया पाटील -निळा सावळा अशा अनेक सुमधुर गाण्याची मैफिल जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर रंगली. प्रमुख आकर्षण ठरलं ते ९२ वर्षाच्या भाटे आजोबांचे गाणं. या वयातही भाटे आजोबांचा उत्साह बघुन उपस्थित सर्वच गायकांना व रसिक प्रेक्षकांना एक वेगळंच स्फुरण चढलं होत . सोबत ८२ वर्षीय भालेराव काकांनी दत्ताच्या पालखीचं गाणं गाऊन रंगत आणली . अशा अनेक जेष्ठ नागरिकांचा गाण्याचा उत्साह बघुन सर्वच प्रेक्षकांनी संगीत कट्ट्याचे भरभरुन कौतुक केले व अभिनय कट्ट्याप्रमाणेच संगीत कट्टा देखील भविष्यात अनेक विक्रम रचणार यात शंका नाही असे मत एका जेष्ठ प्रेक्षकाने व्यक्त केले .ज्येष्ठ नागरिक संगीत कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. 

Web Title: Thane Senior Citizen increased the cost of entertainment for 92 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.