ठाण्यात महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारपदी रुजू

By admin | Published: May 1, 2016 01:54 AM2016-05-01T01:54:08+5:302016-05-01T01:54:08+5:30

ठाणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी सकाळी मावळत्या जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे घेऊन कार्यभार स्वीकारला.

Thane, Mahendra Kalyankar | ठाण्यात महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारपदी रुजू

ठाण्यात महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारपदी रुजू

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी सकाळी मावळत्या जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे घेऊन कार्यभार स्वीकारला. ते ९४वे ठाणे जिल्हाधिकारी ठरले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे चा शहर पोलीस क्रीडा संकुल येथे होणाऱ्या कार्यक्रमस्थळाची पाहणीही केली. यापूर्वी ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
व्यवस्थापन शास्त्रात डॉक्टरेट झालेले कल्याणकर यांनी एलएलएम केले असून ते २००७ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत रूजू झाले. त्यानंतर २००८ ते १० या काळावधीत त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले. तर २०१४ मध्ये त्यांनी अकोला महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. महाराट्राच्या विविध जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी मिशन नवचेतना, पंचायत राज सशक्तीकरण अभियान, विकास निधीतून ग्रामपंचायतीना कर्ज, कायापालट योजना, जलयुक्त शिवार,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामिगरी करू न त्यांनी आपला ठसा उठवला आहे. याच कामगिरीच्या जोरावर ते ठाणे जिल्हाधिकारी पदी विराजमान झाले आहेत.

Web Title: Thane, Mahendra Kalyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.