ठाणेकरांनी गांवदेवी मैदानावर आज अनुभवली शून्य सावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 08:14 PM2019-05-17T20:14:33+5:302019-05-17T20:20:46+5:30

या शुन्य सावली दिनाचे औचित्य साधून यावेळ मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी प्रथम शून्य सावली दिवसाचे महत्त्व पटवून देऊन पृथ्वीच्या गोल दाखवून आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त, अंटाक्टिकावृत्त यांची माहिती देत शास्त्रोक्त पध्दतीने देऊन मार्गदर्शन केले.

Thane Karve has seen the shadow of today on the village! | ठाणेकरांनी गांवदेवी मैदानावर आज अनुभवली शून्य सावली !

सर्व उपस्थितांनी मोठे रींगण करून शून्य सावलीचा अनुभव घेतला, एक उंच सिलिंडर , गोलाकृती उपकरणाद्वारे शून्य सावली

Next
ठळक मुद्देठाणेकरांना तो आज शुक्रवारी १७ मे व २७ जुलै या दोन दिवशी शुन्य सावली दिनगावदेवी मैदानावर शुक्रवारी दुपारी १२.३५ वाजता ‘शुन्य सावली’ दिनाचा अनुभव घेतलासर्व उपस्थितांनी मोठे रींगण करून शून्य सावलीचा अनुभव

ठाणे : ठाणेकरांनी येथील गावदेवी मैदानावर शुक्रवारी दुपारी १२.३५ वाजता ‘शुन्य सावली’ दिनाचा अनुभव घेतला. यासाठी खास मराठी विज्ञान परिषद आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मैदानवर शून्य सावली दिना निमित्त प्रात्यक्षिकांचेही आयोजन करीत शुन्य सावली दिनाची माहिती ठाणेकर जनतेला यावेळी करून देण्यात आली. यावेळी ठाणेकरासह शालेय विद्यार्थ्यांनी आणि खगोल अभ्यासकांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शुन्य सावली दिनाचे औचित्य साधून यावेळ मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी प्रथम शून्य सावली दिवसाचे महत्त्व पटवून देऊन पृथ्वीच्या गोल दाखवून आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त, अंटाक्टिकावृत्त यांची माहिती देत शास्त्रोक्त पध्दतीने देऊन मार्गदर्शन केले. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशात आकाशात डोक्यावर सूर्य आल्याने वर्षातून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. ठाणेकरांना तो आज शुक्रवारी १७ मे व २७ जुलै या दोन दिवशी शुन्य सावली दिन अनुभवता येत असल्याचे जाणीव सोमण यांनी करून दिली.
या दोन दिवशी आकाशात सूर्य डोक्यावर येतो. परंतु जुलै महिन्यात आकाश अभ्राच्छादित असते. त्यामुळे १७ मे हा एकच दिवस शून्य सावली प्रात्यक्षिकासाठी मिळतो. यास अनुसरून सोमण यांनी या विषयी उपस्थिताना सखोल मार्गदर्शन करून सोप्या पध्दतीने या शुन्य सावली दिनाचे वैशिष्ट्य पटवून दिले. पुस्तकातील भूगोल स्वत: निरीक्षण करून अभ्यासता येतो. पण शुन्य सावली दिनाच्या वेळी ठाणे, कल्याण शहरांचे अक्षांश उत्तर १९ अंश १२ कला या स्थितीत राहते. यानुसार शुक्रवारी १७ मे रोजी सूर्याची तेवढीच क्र ांती झाल्यामुळे दुपारी १२.३५ वाजे दरम्यान आपली सावली अदृश्य झाल्याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांनी मोठे रींगण करून शून्य सावलीचा अनुभव घेतला, एक उंच सिलिंडर , गोलाकृती उपकरणाद्वारे शून्य सावली अनुभवली. सावली ठीक पायाखाली आल्यामुळे अदृश्य झाली. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह ना. द. मांडगे, साधना वझे. दिलीप गोखले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Thane Karve has seen the shadow of today on the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.