ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 06:49 PM2017-12-03T18:49:56+5:302017-12-03T18:51:08+5:30

ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.

Thane district will be shifted to 267 schools; 44 schools closed forever | ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद

ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद

Next
ठळक मुद्देशाळा बंदचे संकट तुर्तास टळले असले तरी स्थलांतर म्हणजेच संबंधीत गावातील शाळा गावक-यांसाठी बंद होणारराजकीय पक्षांच्या प्रचाराकाना या शाळांच्या मुद्यावर गावक-यांकडून जाब विचारला जाणार

ठाणे : जिल्ह्यात वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या ३११ प्राथमिक शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) आहेत. यातील केवळ ४४ शाळा कायमच्या बंद होणार आहेत. तर उर्वरित २६७ शाळांचे जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र शाळा बंद व काहींचे स्थलांतर करण्याच्या मुद्यावरून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जि.प. व पंचायत समित्यांच्या (पं.स.) निवडणूक प्रचारा दरम्यान गावकऱ्यांकडून जाब विचारला जाणार आहे.
जि.प. व पं. स.च्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचार रंगात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून सुरू झाल्या. या विषयी ‘ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वाऱ्यांवर’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिध्द  करून  हा विषय उघडकीस केला आहे. त्याची वेळीच दखल घेत शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांचे सर्वेक्षण केले. त्यात ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहेत. यातील दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या ४४ शाळांचा शोध घेऊन त्या बंद होणार आहे. तर २६७ शाळांचे अन्यत्र स्थलांतरण होणार आहे. या शाळा बंदचे संकट तुर्तास टळले असले तरी स्थलांतर म्हणजेच संबंधीत गावातील शाळा गावक-यांसाठी बंद होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचाराकाना या शाळांच्या मुद्यावर गावक-यांकडून जाब विचारला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकत्र येऊन उमेदवारांना वेठीस धरणार आहेत.

Web Title: Thane district will be shifted to 267 schools; 44 schools closed forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.