ठाणेकर ठरवणार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:51 AM2018-06-26T01:51:32+5:302018-06-26T01:51:35+5:30

आरोप, प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकरिता सोमवारी भरपावसात रांगा लावून रेकॉर्डब्रेक मतदान झाले

Thane corporator will decide | ठाणेकर ठरवणार आमदार

ठाणेकर ठरवणार आमदार

Next

ठाणे : आरोप, प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकरिता सोमवारी भरपावसात रांगा लावून रेकॉर्डब्रेक मतदान झाले. मतपेटीद्वारे मतदान असल्याने मतदारांना रांगेत अधिक काळ उभे राहावे लागत होते. प्रथमच चुरशीच्या झालेल्या या तिरंगी निवडणुकीत कोण विजयी होणार याचा कौल अर्थातच बहुसंख्येनी असलेला ठाण्यातील मतदार देणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा प्रथमच रंगतदार ठरली आहे. प्रमुख लढत भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्टÑवादीचे नजीब मुल्ला यांच्यात होत आहे. सोमवारी सकाळपासून तुफान पाऊस असूनही ठाण्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचा कमालीचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यात ५४ मतदान केंद्रावर मतदानप्रक्रिया सुरू होती. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान करताना मोबाइल फोन जमा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे सरस्वती शाळेच्या मतदान केंद्रावर मतदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली; परंतु नंतर मतदारांनी पोलिसांच्या सुचना मान्य केल्या. पदवीधर पोलिसांना मतदान करण्यासाठी अर्ध्या तासाची सुट्टी देण्यात आली होती. काहींनी आधीच पोस्टल मतदानाचा हक्क बजावला होता. ईव्हीएम मशिनद्वारे होणाºया मतदानावर आक्षेप घेतले जात असताना या निवडणुकीत मतपेटीद्वारे मतदान केले गेले. मात्र त्यामुळे मतदान प्रक्रियेला होत असलेल्या विलंबाबाबत काही मतदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
मागील निवडणुकीत या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास मतदार होते. यावेळी १ लाख ४ हजार २६४ मतदारांची नोंद झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही तब्बल ४५ हजार ८३४ एवढी आहे. शेजारील पालघर जिल्ह्यातील मतदारांची संख्या १६ हजार ९८२ एवढी आहे तर रायगड जिल्ह्यातील मतदारांची १९ हजार ९१८ एवढी आहे. रत्नागिरीतील मतदारांची संख्या १६ हजार २२२ एवढी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची मतदारांची संख्या ही ५ हजार ३०८ एवढी आहे. येत्या गुरुवारी या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार ते स्पष्ट होईल.

Web Title: Thane corporator will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.