ठाण्यात महिलांना देहविक्रीस लावणा-या तिघांना अटक; पीडित दोघींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 08:03 PM2018-01-27T20:03:08+5:302018-01-27T20:09:44+5:30

Thane arrests women in Thane; Both of them were released | ठाण्यात महिलांना देहविक्रीस लावणा-या तिघांना अटक; पीडित दोघींची सुटका

ठाण्यात महिलांना देहविक्रीस लावणा-या तिघांना अटक; पीडित दोघींची सुटका

Next
ठळक मुद्दे फरार चौघांचा शोध सुरूहॉटेलमध्ये वेटरद्वारे मोबाइल फोन करून बोलवत


ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना देहविक्री करण्यास लावणा-या सात जणांपैकी तिघांना अटक करून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. याप्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घोडबंदर रोडवरील शुभम लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग या हॉटेलमध्ये तेथील वेटरद्वारे मोबाइल फोन करून आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन महिलांना पैशांचे आमिष दाखवून लॉजवर बोलवण्यात येते. तसेच त्यांना त्याच लॉजमध्ये शरीरसंबंधांसाठी महिलेची मागणी करणा-या ग्राहकांकडून पैसे घेऊन देहविक्री करण्यासाठी पाठवणाºया अटकेतील महेश रामधनी यादव (५०), योगेश विश्वनाथ शेट्टी (३३) आणि युगेश्वरकुमार ऊर्फ सुनील वकील यादव (२१) तसेच फरार शंकर पितांबर यादव, जयराम शेट्टी आणि महेश शेट्टी व राधेश्याम यादव अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्या दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवार, २४ जानेवारीला रात्री घोडबंदर रोडवरील ओवळानाका परिसरात करण्यात आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तर, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील करत आहेत.
 

Web Title: Thane arrests women in Thane; Both of them were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.