शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार तातडीने जमा करण्यासाठी ठाणे प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 07:33 PM2019-02-05T19:33:39+5:302019-02-05T19:38:03+5:30

* असा आहे कालबध्द कार्यक्र म - - तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक , मंडळाधिकारी, नायब तहसीलदार यांचे प्रशिक्षण ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत पात्र खातेदार शेतकºयांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी संगणीकृत असेल. १० ते १२ फेब्रुवारी शेतकºयांचे कुटुंब निहाय वर्गीकरण करण्यात येईल. २० फेब्रुवारीपर्यंत परिशिष्ट अ आणि ब मध्ये हरकती देता येतील. २० ते २१ फेब्रुवारी या काळात आवश्यक दुरु स्त्या करून अंतिम यादी तहसील कार्यालयात तयार होईल. २६ फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावर समितीमार्फत पडताळणी होऊन मग ती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.

 Thane administration ready for depositing six thousand rupees annually on farmers' accounts promptly | शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार तातडीने जमा करण्यासाठी ठाणे प्रशासन सज्ज

अल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य तातडीने मिळणून देण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा

Next
ठळक मुद्देअल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य तातडीनेजिल्हा प्रशासन यंत्रणा जिल्ह्यात सज्जप्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेची अंमलबजावणी तत्काळ

ठाणे : अल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य तातडीने मिळणून देण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा जिल्ह्यात सज्ज झाली आहे. या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेची अंमलबजावणी तत्काळ आणि अतिशय काटेकोरपणे करावी, यासाठी तालुका पातळीवर देखील कृषी सहायक, तलाठी, ग्राम सेवक यांची प्रशिक्षणे घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना लाभ मिळेल असे पाहण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी तातडीने घेतलेल्या बैठकीत संबंधीत अधिका-यांना दिले.
नुकत्याच जाहीर झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या जिल्ह्यातील अंमलबजावणी संदर्भात मुख्य सचिवांनी देखील राज्यातील जिल्हाधिकाा-यांन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, अग्रणी बँक, महसूल विभागाचे अधिकारी यांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आज पार पाडलेल्या जिल्हा समितीच्या पहिल्या बैठकीत निर्देश दिले. जिल्हाधिकारी या योजनेचे प्रमुख असून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील नोडल अधिकारी आहेत.
अल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आहे. ज्या कुटुंबांचे सर्व ठिकाणाचे मिळून लागवडीलायक क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे. जिल्ह्यातील विविध सनियंत्रण समित्यांमार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये तालुका स्तरीय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी याना प्रशिक्षण देणे महत्वाचे असून उद्यापासून हे प्रशिक्षण सुरु करावे असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. कालबध्द पद्धतीने ठाणे जिल्ह्यात याची अंमलबजावणी झाली पाहिजे. येणा-या तक्ररींचे निराकरणही व्यवस्थित व्हावयास हवे. तालुका पातळीवर प्रांत अधिकारी अध्यक्ष व उप विभागीय कृषी अधिकारी सदस्य व तहसीलदार नोडल अधिकारी आहेत. याशिवाय ग्रामस्तरीय समित्यांमध्ये तलाठी समिती प्रमुख व ग्रामसेवक सदस्य आहेत. ग्रामस्तरीय समिती पात्र शेतकरी कुटुंबांची निश्चिती करून विशिष्ट नमुन्यात त्यांची नोंद घेईल. यामध्ये शेतकºयांची आधार, बँक खाते, मोबाईल क्र मांक आदी माहिती भरली जाणार आहे. यात तलाठ्यांची मुख्य भूमिका आहे.
* असा आहे कालबध्द कार्यक्र म -
- तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक , मंडळाधिकारी, नायब तहसीलदार यांचे प्रशिक्षण ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत पात्र खातेदार शेतकºयांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी संगणीकृत असेल. १० ते १२ फेब्रुवारी शेतक-यांचे कुटुंब निहाय वर्गीकरण करण्यात येईल. २० फेब्रुवारीपर्यंत परिशिष्ट अ आणि ब मध्ये हरकती देता येतील. २० ते २१ फेब्रुवारी या काळात आवश्यक दुरु स्त्या करून अंतिम यादी तहसील कार्यालयात तयार होईल. २६ फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावर समितीमार्फत पडताळणी होऊन मग ती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.

Web Title:  Thane administration ready for depositing six thousand rupees annually on farmers' accounts promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.