ठाण्यातील अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:59 PM2018-11-12T15:59:06+5:302018-11-12T16:03:43+5:30

अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते. 

Thane acting play L Presentation of "Remembrance Bridges" on the occasion of Deshpande's birth centenary | ठाण्यातील अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण

ठाण्यातील अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण

Next
ठळक मुद्देअभिनय कट्टयावर "आठवण पुलंची" चे सादरीकरणपुलंच्या जन्मशताब्दी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजनपुलंच्या साहित्यावर आधारित अभिवाचन

ठाणे : सुप्रसिद्ध लेखक,कादंबरीकार व अख्या महाराष्ट्राला विनोदाच्या माध्यमातून हसवणारे  व्यक्तिमत्व म्हणजे पूल देशपांडे होय.पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त अभिनय कट्टा येथे "आठवण पुलंची" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी पुलंच्या साहित्यावर आधारित अभिवाचन केले.व यावेळी विविध एकपात्री,द्विपात्री देखील सादर करण्यात आल्या.

     पुल या साहित्यिकाची ओळख नाही असा एकही व्यक्ती आपणास शोधून सापडणार नाही.मराठी साहित्यात त्यांनी इतिहास घडवला असून त्यांनी नाट्य व साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान विसरणे शक्य नाही. यावेळी सहदेव कोळंबकर, कुंदन भोसले,कुणाल पगारे यांनी असा मी असा मी या पस्तकातील सखाराम गटणे या पात्रावर अधारित एक लघुनाट्य सादर केले.ओमकार मराठे व शुभम कदम यांनी वरात या कथेतील दारू या प्रसंगावर सादरीकरण केले. शुभांगी भालेकर यांनी कावळा या विषयावर अभिवाचन केले. सौरभ मुळे याने गणगोत या पुस्तकातील रावसाहेब या कथेचे अभिवाचन केले. सौरभने उत्तमरीत्या सादरीकरण करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.वैभव पवार याने गणगोत पुस्तकातील दिनेश हि कथा सादर केली.वैभव चव्हाण याने अंतुबर्वा हे पत्र वाचन करत जिवंत केले.साक्षी महाडिक हिने आयुष्य या पूल लिखित कवितेचे वाचन केले. प्रथमेश मंडलिक याने "एकच प्याला" हि एकपात्री सादर केली. अनिल बोतालजी यांनी मिमिक्री सादर करत रसिकांची मने जिंकली. यावेळी कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले.दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक अल्का वढावकार यांनी केले. अल्काताई यांनी पु. ल. यांच्या कविता सादर केल्या. पु. ल. देशपांडे हे खरंच साहित्य क्षेत्रातील भाई होते असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले. आणि इथून पुढे अभिनय कट्याच्या वाचक कट्टयावर वर्षभर किमान अर्धा तास पुलंचे  साहित्य वाचले जाईल असे सांगितले.

Web Title: Thane acting play L Presentation of "Remembrance Bridges" on the occasion of Deshpande's birth centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.