महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या आरपीएफच्या जवानाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:45 AM2018-06-21T05:45:38+5:302018-06-21T05:45:38+5:30

आरपीएफच्या जवानाने कल्याण रेल्वेस्थानकात एका महिलेशी अश्लील चाळे केल्याने त्याला संतप्त प्रवाशांनी चोप दिला.

Suspension of RPF jaw for sexually assaulting a woman | महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या आरपीएफच्या जवानाचे निलंबन

महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या आरपीएफच्या जवानाचे निलंबन

Next

कल्याण : आरपीएफच्या जवानाने कल्याण रेल्वेस्थानकात एका महिलेशी अश्लील चाळे केल्याने त्याला संतप्त प्रवाशांनी चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेताच, आरपीएफ प्रशासनाने जवान राजेश झामगिरे याच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
फलाट क्रमांक चारवर एक महिला गाडीची वाट पाहत होती. ती एका बाकावर बसली होती. तेथे अन्य प्रवाशीही होते. ती तिच्याजवळ असलेल्या बाळाला दूध पाजत होती. त्या वेळी तिच्या शेजारी बॅग घेऊन बसलेल्या आरपीएफच्या जवानाने तिच्या पाठीला हात लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्याने दोन-तीन वेळा केला. महिला बाजूला सरकली तरी त्याचे हे कृत्य सुरू होते. हा प्रकार पाहून अन्य प्रवाशांनी त्याला तेथे चोप दिला. त्याने प्रतीकार करत त्यांनाच दरडावण्याची भाषा केली. हा सगळा प्रकार एका प्रवाशाने मोबाइलमध्ये कैद करून तो व्हायरल केला. हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वीचा आहे. प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेताच आरपीएफ प्रशासनाने त्याच्याविरोधात नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेतील पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाºया तरुणाचा शोध कल्याण रेल्वे प्रशासन फलाटावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत आहे.

Web Title: Suspension of RPF jaw for sexually assaulting a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.