भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी साजरी केली इकोफ्रेंडली होळी धुळवड

By नितीन पंडित | Published: March 23, 2024 06:18 PM2024-03-23T18:18:56+5:302024-03-23T18:19:06+5:30

जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंद साजरा केला. 

Students of Rahnal Zilla Parishad School in Bhiwandi celebrated eco friendly Holi Dhulwad | भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी साजरी केली इकोफ्रेंडली होळी धुळवड

भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी साजरी केली इकोफ्रेंडली होळी धुळवड

भिवंडी : तालुक्यातील राहनाळ जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंद साजरा केला. भिवंडीतील राहनाळ शाळेत होळी व धुळवड सणाच्या निमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच राजश्री पाटील,अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बीट, गाजर, झाडाची पान-फले आणि हळद यांच्या पासून नैसर्गिक रंग तयार केले.

आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या,कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार नाहीसे करण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील नकारात्मकता कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी पांडे व परी बिंद यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते सादर केली. होलीकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली. केंद्र प्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक, पालक तसेच विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये,प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Students of Rahnal Zilla Parishad School in Bhiwandi celebrated eco friendly Holi Dhulwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.