मुक्त रिक्षापरवाने किमान दोन वर्षे बंद करा, ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:47 AM2017-10-26T03:47:51+5:302017-10-26T03:48:11+5:30

कल्याण : एमएमआर क्षेत्र आणि कोकण रिजनमध्ये मुक्त रिक्षा परवाने देण्यास सरकारने सुरुवात केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

Stop the free racket for at least two years, Thane Region Rickshaw-Taxi Association has made a demand | मुक्त रिक्षापरवाने किमान दोन वर्षे बंद करा, ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाने केली मागणी

मुक्त रिक्षापरवाने किमान दोन वर्षे बंद करा, ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाने केली मागणी

googlenewsNext

कल्याण : एमएमआर क्षेत्र आणि कोकण रिजनमध्ये मुक्त रिक्षा परवाने देण्यास सरकारने सुरुवात केल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. रिक्षाचा व्यवसाय हा रेल्वेस्थानक केंद्रित असल्याने तेथे वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात जास्त आहे. रेल्वेस्थानकात पुरेसे स्टॅण्ड तसेच पार्किंगची सोय नाही. त्यामुळे मुक्त परवानेपद्धती किमान दोन वर्षांकरिता स्थगित करावी, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागाने केली आहे.
महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर म्हणाले, कल्याण आरटीओ क्षेत्रात सध्या २७ हजार रिक्षा आहेत. त्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा परिसर येतो. त्यापैकी केवळ कल्याणमध्ये नऊ हजार रिक्षा आहेत. कल्याण पूर्वेला यार्ड असल्याने रिक्षा रेल्वेस्थानकापर्यंत येत नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतून रिक्षा प्रवाशांना कल्याण पश्चिमेला सोडतात. कल्याण पश्चिमेतील रिक्षा स्टॅण्डमध्ये एका वेळेस ४५० रिक्षा उभ्या राहू शकतात. शहरातील नऊ हजार रिक्षांच्या तुलनेत स्टॅण्ड अपुरे आहेत. तसेच स्थानक परिसरात अन्य खाजगी वाहनांसाठी पार्किंगची सक्षम सुविधा नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमुळे स्थानक परिसरात कोंडी होते, असा होणारा आरोप योग्य आहे.
कल्याण शहरात १५० रिक्षा स्टॅण्ड आहेत. आणखी १०० रिक्षा स्टॅण्ड प्रस्तावित आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. स्थानक परिसरात आता मोक्याच्या जागा नाहीत. त्यामुळे नव्याने रिक्षा स्टॅण्ड कुठे उभे करणार, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. हा प्रश्न केवळ कल्याणपुरता नसून तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी आहे. प्राधिकरणाच्या क्षेत्रात ठाणे, रायगड आणि पालघर हे जिल्हे येतात. आमची संघटना कोकण विभागाचे नेतृत्व करते. त्यामुळे ठाणे, पालघर, वसई, विरार, भार्इंदर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागाचा विचार केला, तर आजमितीस या कोकण परिसरात दीड लाख रिक्षा व्यवसाय करतात. ठाणे शहरात ३२ हजार, पनवेलमध्ये साडेआठ हजार रिक्षाचालक तर वाशी परिसरात आठ हजार रिक्षाचालक आहेत. परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. आॅनलाइन परमिट मुक्त केल्याने अनेकांनी इरादापत्रे आरटीओकडे सादर केली आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात साडेसहा हजार लोकांनी मुक्त परवानापद्धतीत इरादापत्रे दिली आहे. मुक्त परवानेपद्धती ही सर्वांसाठी खुली असल्याने प्रत्येक जण परमिटसाठी नावनोंदणी करून इरादापत्र देत आहे. आधीच रिक्षांची संख्या जास्त आहे. त्यात मुक्त परवानापद्धतीमुळे रिक्षांची संख्या वाढणार आहे, असे पेणकर
पुढे म्हणाले.
>परिवहनमंत्र्यांना पत्र
कल्याण-डोंबिवलीत पार्किंगची व्यवस्था नाही. रिक्षास्टॅण्ड नाहीत. त्यामुळे भर पडणाºया नवीन रिक्षांमुळे वाहतूककोंडीत अधिक भर पडणार आहे. मुक्त परवानापद्धती सरकारने किमान दोन वर्षे स्थगित करावी, अशी मागणी पेणकर यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे. या आशयाचे पत्र परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे दिले आहे.

Web Title: Stop the free racket for at least two years, Thane Region Rickshaw-Taxi Association has made a demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण