सळसळत्या तरुणाईचा उत्साही जल्लोष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:22 AM2017-10-19T06:22:43+5:302017-10-19T06:23:00+5:30

तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेशभूषेने बहरलेले रस्ते, वेस्टर्न तडका, हिंदी-मराठी गीतांवर धरलेला ठेका, तरुणतरुणींचा जल्लोष आणि दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव अशा उत्कट-उत्साही वातावरणात दिवाळीचा पहिला दिवस

 Soothing youthful enthusiasm | सळसळत्या तरुणाईचा उत्साही जल्लोष  

सळसळत्या तरुणाईचा उत्साही जल्लोष  

googlenewsNext

ठाणे : तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेशभूषेने बहरलेले रस्ते, वेस्टर्न तडका, हिंदी-मराठी गीतांवर धरलेला ठेका, तरुणतरुणींचा जल्लोष आणि दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव अशा उत्कट-उत्साही वातावरणात दिवाळीचा पहिला दिवस अर्थात दिवाळी पहाट चांगलीच रंगली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गर्दीचा महापूर ओसंडून वाहत होता. ऊन वर येईपर्यंत दिवाळी पहाटचा जल्लोष ठाण्यातील चौकाचौकांत रेंगाळलेला दिसून आला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला राममारुती रोड, तलावपाळी येथे एकत्र जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही तरुणाईने राखली. पहाटे ६ वाजल्यापासून राममारुती रोड, तलावपाळी, गोखले रोड या ठिकाणी तरुणतरुणींचे घोळके जमू लागले. सकाळी ८ वाजता हे तिन्ही रस्ते रंगीबेरंगी भरजरी गर्दीने तुडुंब भरले. राममारुती रोड व तलावपाळी हे गर्दीने तर ओसंडून वाहत होते. प्रत्येक जण पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होता आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शुभेच्छा देऊन सणाचा आनंद व्यक्त करत होता. राममारुती रोड येथे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या वतीने ब्रास बॅण्ड, ठाणे युवाच्या वतीने डीजे, ढोलताशा, रॉक बॅण्ड, रॅप, दी ब्रदर्स प्रतिष्ठानच्या वतीने आणि तलावपाळी येथे खा. राजन विचारे यांच्या वतीने डीजेचे आयोजन केले होते. ‘कोंबडी पळाली’, ‘या कोळीवाड्याची शान’, ‘बाई वाड्यावर या’, ‘आला बाबुराव’, ‘शांताबाई’ यासारख्या मराठी गाण्यांसह हिंदी गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. कधी काळी फक्त भेटून शुभेच्छा देऊन साजरी करण्यात येणाºया दिवाळी पहाटचे अलीकडे स्वरूपही बदलले. केवळ शुभेच्छा नव्हे, तर ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाºया डीजेवर ठेकाही धरला जात आहे. त्यामुळे गर्दीही वाढू लागली आहे. गेल्या वर्षीपेक्षा कैक पट अधिक गर्दी या वेळी दिसून आली. या वेळी पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता. या तरुणाईला शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, खा. राजन विचारे, सभागृह नेते नरेश म्हस्के, आ. रवींद्र फाटक, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.


सेल्फी क्रेझ
दिवाळी पहाटच्या वातावरणात प्रत्येक जण आपला फोटो कॅमेºयात टिपत होता. या वेळी सेल्फी क्रेझ प्रामुख्याने पाहायला मिळाली. ही अविस्मरणीय दिवाळी पहाट कॅमेºयात बंदिस्त केली जात होती.

ंमहिला, लहान
मुलांची उपस्थिती
राममारुती रोडवर अवघी तरुणाई थिरकत असताना मायलेकीच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगदी बिनधास्तपणे ही चिमुरडी आपल्या आईसोबत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटत होती. दोघींच्या चेहºयावरील नृत्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

ंघामाच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसा उकाडा जाणवत आहे. बुधवारी सकाळी तरुणाई घामाच्या धारांनी त्रासली होती. गर्दी भरपूर असल्याने व त्यात जो तो थिरकत असल्याने उकाड्याचा त्रास अधिक जाणवत होता. घामाच्या धारांनी ठाणेकर अक्षरश: चिंब भिजले.


गर्दीमुळे मित्रमैत्रिणींची शोधाशोध
यंदा राममारुती रोड, तलावपाळी येथे तरुणाईच्या गर्दीने उच्चांक गाठल्याने चालायला मुंगीएवढीदेखील जागा नव्हती. त्यामुळे या गर्दीत मित्रमैत्रिणींचा हात सुटला, तर एकमेकांना शोधणे कठीण जात होते. आपल्या मित्रमैत्रिणींची शोधाशोध करण्यातच अनेकांचा बराच वेळ खर्च झाला.

 

Web Title:  Soothing youthful enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे