स्कायवॉकवर भिकाऱ्यांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:44 AM2018-09-17T04:44:48+5:302018-09-17T04:45:24+5:30

स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसताना त्यात भिकाऱ्यांची भर पडल्याने पादचाऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.

Skywalk encroach on beggars! | स्कायवॉकवर भिकाऱ्यांचे अतिक्रमण!

स्कायवॉकवर भिकाऱ्यांचे अतिक्रमण!

Next

डोंबिवली : येथील स्कायवॉकवर बिनधास्त फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे, आता त्यावर भिकाऱ्यांचाही वावर वाढला आहे. पूर्वेकडील भागात हे बकालतेचे चित्र सर्रास पाहयला मिळते. स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसताना त्यात भिकाऱ्यांची भर पडल्याने पादचाऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
सद्यस्थितीला महापौर विनिता राणे यांच्या आदेशानुसार स्थानक परिसरात काही प्रमाणात कारवाई होत असली तरी स्थानकाच्या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकवरील फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचा बिनधास्तपणे भरणारा बाजार अद्यापपर्यंत हटविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. प्रारंभी रात्री उशीरा हा बाजार भरायचा. पण आता दिवसाढवळयाही काही अंशी अतिक्रमण होऊ लागले आहे. सकाळी आणि सायंकाळी कामावर जाणारे आणि परतणारे चाकरमानी मोठया संख्येने या स्कायवॉकचा वापर करतात. त्यावेळी एकच गर्दी होते. त्यात फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहता त्याठिकाणाहून मार्गस्थ होणाºया पादचाºयाला अक्षरश: चालणेही कठीण होते. छोटी मोठी खेळणी विकणाºया एका कुटुंबाने तर या स्कायवॉकला आपले निवासस्थानच बनविले आहे. दोन्ही बाजूला फेरीवाले, भाजीपाला विक्रेते आणि वडापाव विक्रेत्यांचे अतिक्रमण होत असताना भिकाºयांचा वावर वाढला आहे.
कल्याणच्या स्कायवॉकवर ज्याप्रमाणे भिकारी आणि गर्दुल्यांचा वावर असतो त्याप्रमाणे आता डोंबिवलीच्या स्कायवॉकवरही पूर्वेकडील बाजूसह डोंबिवली पश्चिमेला जोंधळे विद्यालयाकडे उतरणाºया पुलावरही भिकाºयांचा वावर आहे. तर मच्छीमार्केट परिसरात उतरणाºया पुलावर शेड नसल्याने त्या पुलावर मात्र फेरीवाल्यांचे अथवा भिकाºयांचे अतिक्रमण दिसत नाही परंतू वारांगनांचा संचार असतो.

Web Title: Skywalk encroach on beggars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.