घाटघर प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद , वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:51 AM2017-09-07T03:51:51+5:302017-09-07T03:51:59+5:30

ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 The shutdown of the Ghatgha power plant, power generation for 40 days | घाटघर प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद , वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद

घाटघर प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद , वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद

Next

भातसानगर : ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताशी २५० मेगावॅट विजेची निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे.
२८ जुलैला प्रकल्पाच्या दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वीजनिर्मिती संपूर्णपणे बंद आहे. जपानच्या मदतीने बनवलेल्या या वीज केंद्रात दुरूस्ती जपानच्या तंत्रज्ञांशिवाय ते शक्य नाही. याविषयी चोंढे घाटघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. वेरूळकर यांनी सांगितले, २८ जुलैपासून ही निर्मिती बंद असून ती पूर्ववत करण्यासाठीचा खर्च राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात साने घाटघर येथे हा उदयांचल जलविद्युत प्रकल्प आहे. या वीजनिर्मितीसाठी रोजचा जलवापर १.६०७ दशलक्ष घनमीटर, तर आठवड्यासाठीचा जलसंचय ३.४३७ दशलक्ष घनमीटर आहे.

Web Title:  The shutdown of the Ghatgha power plant, power generation for 40 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.