एसटी डेपोंमध्ये तिसºया दिवशीही शुकशुकाट, संपाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:12 AM2017-10-20T06:12:48+5:302017-10-20T06:12:57+5:30

राज्य परिवहन कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाच्या तिस-या दिवशीही एसटी डेपोंमध्ये शुकशुकाटच होता. ठाणे विभागीय नियंत्रण विभागातील ८ डेपोंमधून संध्याकाळपर्यंत एकही गाडी सुटली नसल्याची

 Shukushkat and the result of the strike on the third day in ST Depots | एसटी डेपोंमध्ये तिसºया दिवशीही शुकशुकाट, संपाचा परिणाम

एसटी डेपोंमध्ये तिसºया दिवशीही शुकशुकाट, संपाचा परिणाम

Next

ठाणे : राज्य परिवहन कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाच्या तिस-या दिवशीही एसटी डेपोंमध्ये शुकशुकाटच होता. ठाणे विभागीय नियंत्रण विभागातील ८ डेपोंमधून संध्याकाळपर्यंत एकही गाडी सुटली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर,तीन दिवस शांततेत सुरू असलेल्या संपादरम्यान कर्मचाºयांनी लक्ष्मीपूजनानिमित्त खोपट डेपोमध्ये बसचे पूजन केले.
मंगळवारपासून हा संप सुरू आहे. मागील दोन दिवसात एसटीच्या एकूण १२ गाड्या सुटल्या. सलग दोन दिवस ठाणे-पुणे स्वारगेट पहाटे ५.३० च्या सुमारास सुटलेली गाडी परताना ठाण्यात तिची काच कोणीतरी अनोळखी व्यक्ती फोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर प्रशासनाच्या दडपणाखाली सलग दोन सोडण्यात आलेली ठाणे-पुणे गाडी मात्र गुरुवारी सुटली नाही. त्यामुळे तिसºया दिवशी ठाणे विभागीय नियंत्रण विभागातून एकही गाडी सोडण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आजही मागील दोन दिवसांप्रमाणे प्रवाशांचे हाल झाले.

खोपटमध्ये लक्ष्मीपूजन
गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने ठाण्यातील खोपट एसटी डेपोमध्ये एसटी कर्मचाºयांनी एकत्र येऊन बसचे दरवर्षीप्रमाणे यंदाही पूजन केले.
विश्रांतीगृहाला टाळे?
खोपट येथील विश्रांती गृहाला टाळे लावण्याचा हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपामुळे ठाण्यात बस घेऊन आलेल्या बाहेरील कर्मचाºयांपुढे आता संप मिटेपर्यंत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मरण पावलेल्या कर्मचाºयाला श्रद्धांजली
संपादरम्यान हद्यविकाराच्या धक्काने अकोला आगारातील एस.टी कर्मचारी एकनाथ वाघचौरे यांना मृत्यू झाला. त्या कर्मचाºयाला सकाळी ठाण्यात कळवा एसटी कार्यशाळा आणि खोपट डेपो येथे एस.टी कर्मचाºयांनी श्रद्धांजली वाहली.

Web Title:  Shukushkat and the result of the strike on the third day in ST Depots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.