वाचक कट्ट्यावर शुभुमुहूर्ती 'मंगळ्याचं लगीन' सोहळा संपन्न, अभिवाचनाची मेजवानी सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:02 PM2019-04-26T17:02:54+5:302019-04-26T17:05:55+5:30

अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वाचक कट्ट्यावर कट्टा क्रमांक ४५ रंगला मंगळ्याच्या लग्नाचा अभिवाचनरुपी सोहळा.

Shubhumuhurti on 'Reader's Cut', 'Mangal Ki Lagein', complete with a speech of speech | वाचक कट्ट्यावर शुभुमुहूर्ती 'मंगळ्याचं लगीन' सोहळा संपन्न, अभिवाचनाची मेजवानी सादर

वाचक कट्ट्यावर शुभुमुहूर्ती 'मंगळ्याचं लगीन' सोहळा संपन्न, अभिवाचनाची मेजवानी सादर

Next
ठळक मुद्देवाचक कट्ट्यावर शुभुमुहूर्ती 'मंगळ्याचं लगीन' सोहळाज्येष्ठ साहित्यिक डॉ.र.म.शेजवलकर ह्यांनी अभिवाचनातून सादर केलं 'मंगळ्याचं लगीनसध्याच्या परिस्थितीवर विडंबनात्मक वाचिक सादरीकरण

ठाणे : अभिवाचकांसाठी खुले व्यासपीठ असलेल्या वाचक कट्टा क्रमांक ४५ वर श्रोत्यांसाठी दिग्गज लेखकांची अभिवाचनाची मेजवानी सादर झाली.ज्येष्ठ साहित्यिक डॉ.र.म.शेजवलकर ह्यांनी अभिवाचनातून सादर केलं 'मंगळ्याचं लगीन'.गजरा मालिकेचे लेखक,राजा जो जो रे सारख्या अनेक बालनाट्य,पथनाट्य,कवितांचे लेखक डॉ.र.म.शेजवलकर ह्यांनी 'मंगळ्याचं लगीन' ह्या स्वलिखित वग नाट्यातून सध्याच्या परिस्थितीवर विडंबनात्मक वाचिक सादरीकरण केले.

    मंगळ्याचं लगीन म्हणजे एक तमाशा लोकनाट्य.मंगळावरून पृथ्वीतलावर आलेल्या मंगळ्याला भारतीय बतावणी परंपरेचे खंदे शिलेदार आबुराव व बाबुराव भेटतात. मंगळ्याला ती दोघे पृथ्वीतलाची माहिती देताना  पृथ्वीवर दोन प्रकारच्या जाती आहेत असं सांगतात. एक म्हणजे पुरुष जात आणि दुसरी म्हणजे बाईजात. मग मंगळ्याला ते बाई जात काय असते ते दाखवण्या साठी तमाशात घेऊन जातात. तमाशातील बाई असुद्या किंवा पृथ्वीवरील इतर गोष्टी त्याची पृथ्वीवर राहण्याची उत्सुकता वाढते.त्याच्याकडे कायदेशीर रित्या पृथ्वीवर राहता यावं त्यासाठी लेझरगण च्या बदल्यात आबुराव आणि बाबुराव मिळून त्याच लग्न लावायचं ठरवतात म्हणजे तो कायदेशीर भारतात राहू शकतो.त्याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी अबूराव आणि बाबुराव पेपर मध्ये जाहिरात देतात. जाहिरात बघुन पहिली शिक्षिका ,दुसरे एका मुलीचे बाप नंतर एक म्हातारी मंगळ्यासाठी येते. पण ते सगळे मंगळ्याचा अवतार बघून घाबरतात आणि पळून जातात. शेवटी एक मुलगी येते जी समजातील रूढी परंपरा अन्यायाला खूप वैतागलेली असते.ती मंगळ्याबरोबर लग्न करायला तयार होते फक्त तिची एक अट असते की लग्न झाल्यावर ती मंगळ्याबरोबर मंगळ ग्रहावर राहायला जाणार. ती या देशात नाही राहणार त्यावर तिला विचारल्यावर ती बोलते कि या देशात महिलांवर बलात्कार होतात, हुंडाबळी स्त्रियांचा छळ होतो .त्यासाठी मला इथे नाही राहायचं अस ती बोलते. अखेरीस मंगळ तिची अट मान्य करतो. यावर जेव्हा आबूराव आणि बाबुराव विचारतात की तू का तयार झाला. त्यावर तो उत्तर देतो कि असं करून मी निदान एका स्त्रीचा छळ होण्या पासून वाचवू शकतो. मंगळ्याचं लगीन म्हणजे स्त्रियांवर होणारा अत्याचारावर तसेच विविध सामाजिक राजकीय टीकात्मक भाष्य करणार एक विनोदी लोकनाट्य श्रोत्यांना र.म.शेजवलकर यांच्या विनोदी वाचनातून अनुभवायला मिळाली. शेजवलकरांनी उभी केलेली विविध पात्र शब्दांतून श्रोत्यांसमोर उभी राहिली. वाचक कट्टा ४५ अशा उपदेशात्मक वगनाट्याच्या धम्माल सादरीकरणाने सकळ संपूर्ण झाला. 

      कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शाहीर शांताराम धनावडे ह्यांनी लोकनाट्यातील विविध प्रकारांवर भाष्य करताना 'महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान' ह्या गीतांचे सादरीकरण केले. वाचक कट्ट्याला वेध लागलेत ५०व्या अभिवाचनरुपी बहरलेल्या वाचक कट्ट्याचे.प्रत्येक वाचक कट्टा वाचनसंस्कृतीची संवर्धन करण्यासाठी टाकलेले एक यशस्वी पाऊल जणू.नवीन वाचकांसोबत डॉ.र.म.शेजवलकर यांसारख्या दिग्गज अनुभवी लेखकांनी अभिवाचन करणे हे नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहेअसे मत अभिनय कट्टा वाचक कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.वाचनसंस्कृती टिकण्यासाठी अभिवाचकांसोबतच श्रोत्यांचाही स्थान महत्वाचं आहे.म्हणून वाचक कट्ट्यावरील उपस्थित श्रोत्यांचे किरण नाकती ह्यांनी आभार मानले. वाचक कट्टा क्रमांक ४५ ची सुरुवात अभिनेत्री वंदना मराठे ह्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.सादर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याचे कलाकार  राजन मयेकर ह्यांनी केले.

Web Title: Shubhumuhurti on 'Reader's Cut', 'Mangal Ki Lagein', complete with a speech of speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.