Shocking The 13-year-old woman was hiding in a septic tank after the assassination of her husband | धक्कादायक! पतीची हत्या करुन महिलेने 13 वर्ष सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता नव-याचा मृतदेह

ठळक मुद्दे पोलिसांना आपण जिथे छापेमारीची कारवाई केली तिथे मानवी सांगाडे सापडतील याची कल्पनाही केली नव्हती. बोईसरमधील गांधीपाडा भागातील राहत्या घरातून फरीदा देहविक्रीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ठाणे - पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका महिलेने पतीची हत्या करुन तेरावर्ष नव-याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता. घरात कुंटणखाना चालवण्याच्या प्रकरणात महिलेला अटक झाल्यानंतर पतीच्या हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फरीदा भारती असे आरोपी महिलेचे नाव आहे. फीरादा देहविक्रीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारावर सोमवारी पोलिसांनी फरीदाच्या घरावर छापा मारुन चार महिलांची सुटका केली. 

त्यावेळी आपण जिथे छापेमारीची कारवाई केली तिथे मानवी सांगाडे सापडतील याची कल्पनाही पोलिसांना केली नव्हती. मंगळवारी रात्री पोलिसांनी मारलेल्या दुस-या छाप्यामध्ये त्यांना घरातील सेप्टिक टाकीमध्ये मानवी सांगाडा सापडला. हा सांगाडा फरीदाच्या नव-याचा असून तिने 13 वर्षांपूर्वी नव-याची हत्या करुन मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता. 

बोईसरमधील गांधीपाडा भागातील राहत्या घरातून फरीदा देहविक्रीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी छापा मारला त्यावेळी पोलिसांनी चार महिलांची सुटका केली व फरीदासह तिथे आलेल्या ग्राहकांना अटक केली.  फरीदा फक्त देहविक्रीच्या रॅकेटमध्येच नसून तिने स्वत:च्या नव-यासह अनेकांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

त्याआधारवर पोलिसांनी मंगळवारी मारलेल्या दुस-या छाप्यामध्ये घराच्या टाकीमध्ये मानवी सांगाडा सापडला. पोलीस चौकशीत फरीदाने नव-याची हत्या केल्याची कबुली दिली. तेरावर्षांपूर्वी आपण नव-याची हत्या केली व मृतदेह बाथरुममधल्या सेप्टिक टाकीमध्ये ठेवल्याचे तिने सांगितले. नवरा सहदेव झोपेमध्ये असताना फरीदाने डोक्यावर घाव घालून त्याची हत्या केली होती. ही हत्या तिने का केली ते अजून स्पष्ट झालेले नाही याप्रकरणी तपास सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. 


Web Title: Shocking The 13-year-old woman was hiding in a septic tank after the assassination of her husband
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.