ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट: सात बांग्लादेशींसह १६ महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 09:33 PM2019-01-24T21:33:36+5:302019-01-24T21:38:15+5:30

ठाण्याच्या कापूरबावडी नाक्यावरील हॉटेलमध्ये लॉजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भंडाभोड केला. गुरुवारी या छाप्यात सात बांग्लादेशींसह १६ महिलांची सुटका करुन सहा जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sex racket in Thane hotel: 16 women rescued along with seven Bangladeshi women | ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट: सात बांग्लादेशींसह १६ महिलांची सुटका

लॉजच्या नावाखाली सेक्स रॅकेट

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईबार व्यवस्थापकासह सहा जणांना अटकलॉजच्या नावाखाली सेक्स रॅकेट

ठाणे: हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालविणाऱ्या कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमधून सात बांग्लादेशींसह १६ महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी सायंकाळी सुटका केली. बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा, कॅशियर जगबंधू उर्फ देवा जेना यांच्यासह सहा जणांना या कारवाईत अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमध्ये दोन हजारांच्या बदल्यामध्ये शरीरविक्रयासाठी मुली पुरविल्या जात असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी २ ते रात्री ८.३० वा. च्या दरम्यान याठिकाणी धाड टाकली. या दरम्यान, एका बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गि-हाईकाने या पथकाला मिस कॉल द्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. यामध्ये बार व्यवस्थापक आणि चालक दिवाकर सुवर्णा, खजिनदार जगबंधू, वेटर मनोज सिंग, बनमाळी महाराणा तसेच दोन ग्राहक अशा सहा जणांना अटक करण्यात आली. यात १६ महिलांची सुटका करण्यात आली असून यामध्ये सात बांग्लादेशी तरुणींचाही समावेश आहे. या सर्व महिलांना सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात पिटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sex racket in Thane hotel: 16 women rescued along with seven Bangladeshi women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.