भिवंडीत ग्राहकाच्या शोधात आलेल्या पिस्टल विक्रेत्याकडून तीन पिस्टल काडतूसांसह जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:09 PM2018-03-30T19:09:05+5:302018-03-30T19:09:05+5:30

Seized with three pistol cartridges from a pistol manufacturer in search of a furious customer | भिवंडीत ग्राहकाच्या शोधात आलेल्या पिस्टल विक्रेत्याकडून तीन पिस्टल काडतूसांसह जप्त

भिवंडीत ग्राहकाच्या शोधात आलेल्या पिस्टल विक्रेत्याकडून तीन पिस्टल काडतूसांसह जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देशहापूर-आसनगाव येथून दुचाकीवरून पिस्टल विक्रेता भिवंडीतमध्यप्रदेशातील नेतराजसिंग कासेसिंग स्वत: बनवितो पिस्टलतीन पिस्टलसह १३ काडतूसे जप्त

भिवंडी : शहरात वाडा रोडवरील मेट्रो हॉटेलजवळ ग्राहकाच्या शोधात असलेल्या पिस्टल विक्रेत्यास पोलीसांनी झडप घालून पकडले.शहापूर-आसनगाव येथून दुचाकीवरून आलेल्या पिस्टल विक्रेत्याची पोलीसांनी झडती घेतली असता त्याच्या बॅगेत तीन पिस्तोल व १३ काडतूस मिळून आली. शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असताना पिस्टल खरेदीसाठी ग्राहक मिळतील या हेतूने शहरात आलेल्या नेतराजसिंग कासेसिंग जाधव (३१)यास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पकडले. नेतराजसिंग हा स्वत: पिस्टल बनवित असून तो मुळचा मध्यप्रदेश येथील रहाणारा आहे. गेल्या नऊ वर्षापासून तो शहापूर तालुक्यातील आसनगावच्या दिघेनगरमध्ये आपल्या कुटूंबासह रहात आहे. शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना पहाता पिस्टलच्या खरेदीसाठी ग्राहक मिळतील या हेतूने तो मोटरसायकलवरून शहरात आला होता. पोलीसांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी वाडा रोडवर मेट्रो हॉटेलजवळ सापळा रचला आणि झडप घालून त्यास पकडले. पोलीसांनी त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये ३० हजार रूपयांचे तीन पिस्टल,२६००रूपयांची १३ काडतूसे,रोख रक्कम,मोबाईल सापडले.पोलीसांनी त्याच्याजवळील १ लाख ०८ हजार ०५० रूपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी नेतराजसिंग कासेसिंग याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन त्यास अटक केली आहे. त्यास कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यास २ एप्रिल १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Seized with three pistol cartridges from a pistol manufacturer in search of a furious customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.