श्रेयाच्या वादावर अखेर पडदा

By admin | Published: April 21, 2017 12:04 AM2017-04-21T00:04:39+5:302017-04-21T00:04:39+5:30

मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेल्या एकमेव क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपात श्रेयाचा वाद निर्माण झाला होता

The screen is finally over | श्रेयाच्या वादावर अखेर पडदा

श्रेयाच्या वादावर अखेर पडदा

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेल्या एकमेव क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपात श्रेयाचा वाद निर्माण झाला होता. त्यावर शिवसेनेने हा महापौरांचाच अधिकार असल्याचे स्पष्ट करत श्रेयाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. मात्र भूमिपूजन व उद्घाटनाच्या माध्यमातून श्रेय लाटण्यासाठी नेहमी पहिल्या रांगेत असलेले आमदार नरेंद्र मेहता यांना पालिकेने आवर न घातल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. दरम्यान, दुसरा लोकार्पण सोहळा महापौरांच्या अधिकारात उरकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू झाला आहे. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करुन कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली. त्या अनुषंगाने प्रशासनाने २३ एप्रिलला लोकार्पण सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला. परंतु, कामे पूर्ण न झाल्याने लोकार्पणाच्या मुहूर्तावर अनिश्चिततेचे सावट आहे.
तीन वर्षापासून बंद असलेले क्रीडा संकुल स्थानिक खेळाडूंसाठी खुले करण्यासाठी प्रशासनाने अखेर धोरण निश्चित केले आहे. तत्पूर्वी त्यातील अपूर्णावस्थेतील कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. ती पूर्ण झाल्यानंतरच खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संकुलाचे दुसऱ्यांदा लोकार्पण होणार आहे. यापूर्वी पालिकेने २०१४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संकुलाचे लोकार्पण केले होते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घाईघाईने लोकार्पण उरकण्यात आले होते. बहुतांश कामे अपूर्ण असल्यामुळे तीन वर्षापासून बंद आहे. दरम्यान ते चालवायचे कसे, असा यक्ष प्रश्नही पालिकेसमोर उभा ठाकला. तसेच त्याच्या धोरण निश्चितेतही बराच कालावधी गेला. संकुल त्वरित खुले करावे यासाठी राजकीय व सामाजिक स्तरावर पाठपुरावा सुरू झाला. प्रसंगी उपोषणही करण्यात आले. अखेर प्रशासनाने नमते घेत त्यातील काही बैठे खेळ सुरु केले. परंतु, अद्याप ते पूर्णपणे खुले केलेले नाही.
दरम्यान, हे संकुल आपल्या प्रभागात येत असल्याने प्राधान्याने त्याच्या लोकार्पणाचा अधिकार सेनेचाच असल्याचा दावा नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांनी केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २१ एप्रिलला संकुलाचे लोकार्पण करण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी भाजपानेही २३ एप्रिलला लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित केल्याने संकुलाच्या श्रेयावरील वादाला तोंड फुटले. अखेर शिवसेनेने संकुलाच्या लोकार्पणाचा अधिकार महापौरांचा असल्याचे मान्य करून हे संकुल राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून बांधण्यात आल्याने त्यांना नियोजित लोकार्पणाचे आमंत्रण द्यावे, अशी सेनेची मागणी असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: The screen is finally over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.