नौपाडा परिसरात पुन्हा पार्किंगच्या वेळेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:09 AM2017-12-27T03:09:23+5:302017-12-27T03:09:25+5:30

ठाणे : नौपाडा परिसरात कुठेही कशीेही वाहने लावली जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक वेळेपर्यंत आलटून पालटून पार्किंगची मुभा देण्याचे बदल वाहतूक पोलिसांनी सुरूकेले आहेत.

Resting at the parking lot in the Naupada area | नौपाडा परिसरात पुन्हा पार्किंगच्या वेळेचा घोळ

नौपाडा परिसरात पुन्हा पार्किंगच्या वेळेचा घोळ

Next

ठाणे : नौपाडा परिसरात कुठेही कशीेही वाहने लावली जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक वेळेपर्यंत आलटून पालटून पार्किंगची मुभा देण्याचे बदल वाहतूक पोलिसांनी सुरूकेले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर करून याबाबतच्या हरकती सूचना मागिवल्या आहेत. यापूर्वीही हा प्रयोग झाला होता. पण तो वाहनचालकांच्या सोयीपेक्षा दुकानदारांच्या सोयीसाठी असल्याची टीका झाली होती. आता तर दुकानदार त्यांची वाहने थेट फुटपाथवर आणत असूनही त्यावर कारवाई झालेली नाही.
नौपाड्यातील वाहतुकीसाठी गोखले मार्ग महत्त्वाचा मानला जातो. तसेच शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून या मार्गाला ओळखले जाते. या मार्गावर मागील काही वर्षांपासून वाहनांचा भार वाढल्याने या भागातील राम मारुती रोड, मल्हार सिनेमा, शाहु मार्केट गजानन वडापाव रस्ता आदी ठिकाणी वाहतूककोंडी होते. या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम-विषम अशी पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. परंतु, व्यापारी तसेच ठाणे स्थानकातून रोज कामानिमित्त प्रवास करणारे अनेक प्रवासी या पार्किंगगमध्ये दिवसभर वाहने उभी करतात. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाºयांना वाहनांसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने ते रस्त्यावर इतरत्र ती उभी करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. ती फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पार्किंग पी वन व पी टू अशी करण्याचा निर्णय घेतला. अधिसूचना काढून तसा बदलही सुरू केला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ३ या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजूला तर दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहने उभी करण्यात येतील. त्यामुळे ज्यांना येथे वाहन लावून कामावर याजचे आहे, त्यांची गैरसोय होईल. फक्त दुकानात खरेदीसाठी येणाºयांना ते सोयीचे असेल.
>अशा असतील वाहने लावण्याच्या नव्या वेळा
नौपाडा येथील गजानन महाराज चौक कडून समर्थ भाडांर दुकान, गोखले रोड दरम्यान राम मारुती रोडवर सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत डाव्याबाजूला आणि दुपारी ३ ते सकाळी ७ पर्यंत रत्याच्या उजव्या बाजूला पार्किंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.राम मारुती क्रॉस रोडवरील शाह कलेक्शन दुकान ते नवलाई दुकानापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ तसेच बँक आॅफ बडोदा ते कॉटन किंग दुकानापर्यंत दुपारी ३ ते सकाळी सात यावेळेत पार्किंगची सुविधागोखले रोडकडून सत्यम कलेक्शनकडे येणाºया महात्माफुले रोडवरील वूड लॅन्ड शुज, केंब्रीज दुकान, कुमार प्लॉस्टीक, दुपट्टा घर, विनी कलेक्शन, प्रसाद बंगला, मधू मिलिंद सोसायटी, झवेरी सोसायटी कडीब बाजूस सकाळी ७ ते दुपारी ३ आणि याच मार्गावरील दुसºया बाजूस दुपारी ३ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पार्किंग मुभा दिली आहे. हे बदल १५ दिवसासाठी प्रयोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून या संदर्भातील काही सुचना वा हरकती असल्यास त्या वाहतूक पोलिसांना कळव्यात असे आवाहन केले आहे. या तीनही ठिकाणी कार, जीप, आदींसाठी समांतरपार्किंग असणार असून हलक्या वाहनांसाठीच ही सुविधा उपलब्ध असेल असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Resting at the parking lot in the Naupada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.