मनसे ठाणे शहर अध्यक्षपदी रवींद्र मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:17 AM2018-04-22T06:17:23+5:302018-04-22T06:17:23+5:30

गडकरी रंगायतनसमोर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे शहर अध्यक्षपदावरुन जिल्हा अध्यक्षपदाची बढती दिली.

Ravindra More, president of MNS Thane; | मनसे ठाणे शहर अध्यक्षपदी रवींद्र मोरे

मनसे ठाणे शहर अध्यक्षपदी रवींद्र मोरे

googlenewsNext

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाणे शहराध्यक्षवर रवींद्र मोरे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मनसेच्या ठाणे शहर अध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गडकरी रंगायतनसमोर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे शहर अध्यक्षपदावरुन जिल्हा अध्यक्षपदाची बढती दिली. त्यानंतर हे पद रिक्त होते. जाधव यांच्या नियुक्तीनंतर ठाणे शहर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार? याची चर्चा रंगू लागली होती. या पदासाठी मनसेच्या अन्य काही पदाधिकाऱ्यांनीही इच्छा व्यक्त केली होती. मोरे यांच्यासह मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे आणि महेश कदम यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. या पदावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता मनसैनिकांना होती. गुरूवारी झालेल्या ठाणे शहरातील पदाधिकाºयांच्या कार्यशाळेत राज ठाकरे या पदाची घोषणा करतील, अशी चर्चा दोन दिवस आधीपासूनच मनसेच्या वर्तुळात सुरू होती. परंतु तेव्हा हे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे चर्चेला आणखी रंग चढू लागला. अखेर शनिवारी सकाळी त्यांनी रवींद्र मोरे यांची या पदावर नियुक्ती केली.

मोरे आधीही होते शहराध्यक्ष
२००६ साली पक्ष स्थापनेच्यावेळी पहिल्या शहराध्यक्षपदाचा मान मोरे यांना मिळाला होता. त्यानंतर त्यांनी कोपरी विभाग अध्यक्ष, कोपरी उपशहर अध्यक्ष आणि संपूर्ण ठाणे शहर उपाध्यक्ष ही पदे भूषविली.

रवींद्र मोरे यांच्या नियुक्तीबाबत मला आनंद आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून मनसेमध्ये काम करीत आहेत. ते आधी शहराध्यक्ष असल्याने त्यांना या पदाचा अनुभव आहे. ते ज्या विभागात राहतात त्या विभागातील दोन नगरसेवकांना त्यांनी निवडून आणले आहे. सर्व मनसे कार्यकर्त्यांचे मत होते त्यांनी शहराध्यक्ष व्हावे आणि या मताला राज ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे.
- अविनाश जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष

गेल्या अनेक वर्षांपासून अविनाश जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. ते काम आता आणखी जोमाने करणार. माझ्या नियुक्तीचा निर्णय सर्वानुमते झाला आहे आणि राज ठाकरे यांचा निर्णय सर्वांना मान्य आहे.
- रवींद्र मोरे,
नवनिर्वाचित ठाणे शहर अध्यक्ष

Web Title: Ravindra More, president of MNS Thane;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे