ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश

By सुरेश लोखंडे | Published: August 23, 2022 12:41 PM2022-08-23T12:41:40+5:302022-08-23T12:43:16+5:30

Thane Hospital: जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा.

Ravindra Chavan orders to speed up construction of 900-bed district hospital useful for Thane district | ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश

ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश

googlenewsNext

- सुरेश लोखंडे 
 ठाणे  - जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करा, असे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागांना दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय सेवेत येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर सरंक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध कामांचे प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे निर्देशही चव्हाण यांनी या बैठकीत दिले.

 सिव्हिल रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील  प्रशासकीय अडथळ्यांचा निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुके व ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहुमजली बहुउद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश चव्हाण यांनी जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकक्षेतील विविध कामांचा आढावा चव्हाण यांनी या बैठकीत घेतला.यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस.एस. साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, महापालिकेचे सहाय्यक नगर नियोजनकार सतीश उईके, अशोक राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणेचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Ravindra Chavan orders to speed up construction of 900-bed district hospital useful for Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.