रमजान मुबारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:04 AM2018-05-19T04:04:37+5:302018-05-19T04:04:37+5:30

मुस्लिमधर्मीय वर्षभर ज्या महिन्याची आतुरतेने वाट बघतात, तो रमजान महिना शुक्रवारपासून उत्साहात सुरू झाला.

Ramadan Mubarak | रमजान मुबारक

रमजान मुबारक

Next

मुंब्रा : मुस्लिमधर्मीय वर्षभर ज्या महिन्याची आतुरतेने वाट बघतात, तो रमजान महिना शुक्रवारपासून उत्साहात सुरू झाला. या महिन्यात इंद्रियांवर ताबा मिळवण्याची, दानधर्म करण्याची, वेळेचे गणित तंतोतंत पाळण्याची, धार्मिक कार्ये करण्याची शिकवण मिळते. यामुळे या महिन्याला मुस्लिम अनुयायांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पहाटे लवकर उठून खाद्यपदार्थ खाऊन (सेहरी) उपवास (रोजा) सुरू केला जातो. नंतर दिवसभर पाणीही पित नाहीत. संध्याकाळी उपवास (इफ्तारी) सोडला जातो. उपवास सुरू करण्याच्या आणि सोडण्याच्या वेळा दररोज बदलतात. या महिन्यात रात्रीच्या शेवटच्या (इशा) नमाजच्या वेळी मशिदींमध्ये तराविचे वाचन केले जाते.

दानधर्म केला जातो. जकातच्या रूपाने गरजूंना आर्थिक मदत केली जाते.सकाळी (फजर), दुपारी (जोहर), संध्याकाळी (असर आणि मगरीब), तसेच रात्री (इशा) या नमाज घरांमध्ये तसेच मशिदींमध्ये अदा केल्या जातात. त्यानिमित्त भिवंडीच्या नूर शहा जामा मशिदीसह ठाणे, मुंब्रा, कल्याणमधील मशिदींना रोषणाई करण्यात आली आहे.

Web Title: Ramadan Mubarak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Ramadanरमजान