राज ठाकरे आणि यूपीवासीयांचा डीएनए एकच! - सुब्रमण्यम स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 05:11 AM2017-10-29T05:11:48+5:302017-10-29T05:12:41+5:30

आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. उत्तर प्रदेश, बिहारींविरूद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे आंदोलने करतात.

Raj Thackeray and DNA of the U.P. - Subramaniam Swami | राज ठाकरे आणि यूपीवासीयांचा डीएनए एकच! - सुब्रमण्यम स्वामी

राज ठाकरे आणि यूपीवासीयांचा डीएनए एकच! - सुब्रमण्यम स्वामी

googlenewsNext

डोंबिवली (ठाणे) : आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. उत्तर प्रदेश, बिहारींविरूद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे आंदोलने करतात. पण एके दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. त्याचा डीएनए हैदराबादला तपासासाठी पाठवला असता त्यांचा आणि यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा डीएनए एकच असल्याचे दिसून आले. तसे असेल तर राज ठाकरे हेहीउत्तर प्रदेशातून आल्याचे स्पष्ट होते, असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी येथे केले.

विराट हिंदुस्थान संगम आणि रोटरी क्लबतर्फे ‘विचार वेध’ या व्याख्यानात ‘भारत-उभरते जागतिक नेतृत्व अर्थात एक पाऊल रामराज्याच्या दिशेने’ या विषयावर ते बोलत होते. हिंदुस्थान हा शब्द हिमालय आणि हिंदू सागर या दोन शब्दां’तून तयार झालेला आहे. आर्य खैबरखिंडीतून आले, त्यांनी द्रविडांना हरविले हा खुळचट शोध इंग्रजांनी आपल्यावर लादला. गैरहिंदू लोक म्हणजे मुस्लीम व इतर हे वस्तुत: हे हिंदूच होते. डीएनएचा आधार घेतल्यास सगळ््या भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे उघड होईल, असे सांगताना त्यांना राज ठाकरे यांच्या डीएनएचा संदर्भ दिला.
राज ठाकरे यांच्यापाठोपाठ ओवैसी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. राममंदिरला आमचा विरोध नाही. पण जाहीरपणे समर्थन देता येत नाही. तसे दिल्यास माझ्या मागे दहशतवादी लागतील, असे ओवैसी यांनीच मला सांगितल्याचा दावा करून स्वामी म्हणाले, मुस्लीम राममंदिराच्या जागेवर कब्जा सांगतात. तो पण रामाचे पूजन हा आमचा मूलभूत अधिकार आहे. घटनेनुसार तो महत्त्वाचा आहे आणि तो आम्हालाच मिळणार आहे. हा न्यायालयीन खटला आम्ही ंिजंकणार. त्यामुळे राममंदिर अयोध्येतच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ८०० वर्षाच्या मुस्लीम आक्रमणानंतर आणि ब्रिटिश राजवटीनंतरही भारतात ८० टक्के हिंदू आहेत. हीच आस्मिता देशाला महासत्ता बनवू शकते, असा दावाही त्यांनी केला.
घटनेच्या अधिकारानुसार देशाची एक इंचही जागा दुसरा कोणी
घेऊ शकत नाही. त्यामुळे काश्मिरात लागू केलेले कलम ३७० येत्या दोन वर्षांत कधीही रद्द होऊ शकते, असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, रोटरीचे अध्यक्ष अजय संख्ये, दीपक
काळे, विराट हिंदुस्थान संगमचे राष्ट्रीय सचिव जगदीश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

खरी बाब कोणी सांगत नाही
डॉ. स्वामी यांनी सांगितले, रावणाचा जन्म दिल्लीनजीक नॉयडा येथे झाला होता. त्याला शंकराने वर दिला होता. मंदोदरी ही त्याची पत्नी मूळची मेरठची. त्याने श्रीलंकेत जाऊन कुबेराला हरविले. ही खरी बाब कोणी सांगत नाहीत.

Web Title: Raj Thackeray and DNA of the U.P. - Subramaniam Swami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.