कल्याण रेल्वेस्थानक परिसरामध्ये वेश्या व्यवसाय जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:38 AM2018-08-20T03:38:04+5:302018-08-20T03:38:21+5:30

मद्यपी, गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचेच ‘कल्याण’

Prostitution business tightens in Kalyan railway station premises | कल्याण रेल्वेस्थानक परिसरामध्ये वेश्या व्यवसाय जोरात

कल्याण रेल्वेस्थानक परिसरामध्ये वेश्या व्यवसाय जोरात

googlenewsNext

कल्याण रेल्वेस्थानक, परिसरात रात्रीच्यावेळी गर्दुल्ले, मद्यपींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा काही गैरप्रकार झाल्यास त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न कल्याणच्या सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. या समस्येचे गांभीर्य समजून, पोलिसांनी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.

फलाट क्रमांक-१ वर कल्याणच्या दिशेने वेश्या व्यवसाय करणाºया महिला उभ्या असतात. त्याठिकाणी इंडिकेटरखाली हा प्रकार सुरू असतो. सीसीटीव्हीत हा प्रकार दिसत असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. कारवाई तर सोडाच, त्यांना हुसकावण्याची तसदीही रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांकडून घेतली जात नाही.
कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकाला जोडून असलेल्या स्कायवॉकवरील संतोष हॉटेलच्या दिशेने जाणाºया जिन्यावर देहविक्रय करणाºया महिला उभ्या असतात. तेथून जाणाºया सामान्य महिलांची कुचंबणा होते. हा जिना उतरून खाली आलो की, तिथे रिक्षाचालकांच्या आड काही महिला उभ्या असतात. येथील स्कायवॉकला सुरक्षेचे वावडे आहे. एकदोन सुरक्षारक्षक अमावस्या-पौर्णिमा येथे दिसून येतात. त्यांना फेरीवाले व बेकायदा व्यवसायवाले जुमानत नाही. फेरीवाला कारवाई पथक येण्याची चाहूल लागताच स्कायवॉकवर पळापळ सुरू होते. पथक दाखल होण्यापूर्वी स्कायवॉक काही वेळेपुरता रिकामा होतो. त्यानंतर, लगेच जैसे थे. या सगळ्यांचा त्रास स्कायवॉकवरून जाणाºया नागरिकांना होतो.
कल्याण पूर्वेत बोगद्यातून नागरिकांची येजा बंद करण्यासाठी स्कायवॉक बांधला. मात्र, स्कायवॉक बांधूनही बोगद्यातून आजही येजा सुरू आहे.

रिमॉडेलिंग प्रस्तावित
कल्याण स्थानकातील लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेस्थानके विकसित करण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. चार ते पाच फलाट नव्याने तयार करण्यात येतील. त्याचा वापर पूर्णपणे लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी केला जाईल, जेणेकरून लांब पल्ल्यांची व उपनगरीय गाड्यांची वाहतूक व मार्गक्रमण सुरळीत होईल.

नव्या पुलाचा वापर कमी
कल्याण स्थानकात अंबरनाथच्या दिशेने एक भला मोठा प्रशस्त पादचारी पूल १७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला. त्याला समांतर असलेल्या जुन्या पादचारी पुलावर नव्या पुलाचा वापर करावा, अशी सूचनाही लिहिली आहे. नव्या पादचारी पुलाला लिफ्टची सोय असून सरकता जिना हा स्कायवॉक व जुन्या पादचारी पुलाला जोडला आहे. तिथून नव्या पुलावर जाता येते. मात्र, ज्येष्ठांना या पुलाचा वापर करणे शक्य नाही. त्यामुळे नवा पादचारी पूल जास्त वापरला जात नाही.

लोकग्रामचा पूल धोकादायक
लोकग्राम पादचारी पूल अरुंद आहे. त्या पुलाचे काम झालेले नाही. सध्याचा अरुंद पूल हा कल्याण यार्डाच्या जागेतून जातो. हा पूलही रात्री उशिरा घरी परतणाºया प्रवाशांसाठी सुरक्षित नाही. कल्याण लोकग्रामजवळ पुलाला लागूनच रिक्षातळ असणे गरजेचे आहे. लोकग्रामपुलावरून आलेल्या पादचाºयास अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर रिक्षा मिळते.

यार्डात तृतीयपंथीय
पुलाखाली व पुढील दिशेने लांब पल्ल्यांच्या गाड्या तसेच मालगाड्या लागलेल्या असतात. सात नंबर फलाटावरून पत्रीपुलाच्या दिशेने चालत जाता येते. त्याठिकाणी झाडीझुडुपात, यार्डातील डब्यांचा आडोसा घेत तृतीयपंथीयांचे चाळे सुरू असतात. तीन वर्षांपूर्वीच कल्याण यार्डात एका बांगलादेशी महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.

दुरुस्तीसाठी जुना पूल बंदच
फलाट क्रमांक-१, २ आणि ३ ला जोडणारा जुना पादचारी पूल एल्फिन्स्टनच्या घटनेनंतर बंद करण्यात आला. मुंबईच्या दिशेने असलेला जुना पादचारी पूल हा सगळ्या फलाटांना जोडणारा असला तरी तो अत्यंत अरुंद आहे. गर्दीच्यावेळी तिथे धक्काबुक्की होते.

केवळ पाहणी, कारवाई शून्य
कल्याण स्थानकाची स्वच्छतेबाबतीत घसरगुंडी झाल्यावर खासदार कपिल पाटील व आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेस्थानकाची पाहणी केली. या पाहणीनंतर अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही, असा रेल्वे प्रशासनास इशाराही दिला होता. या पाहणीला दोन महिने उलटून गेले, तरी त्यानंतर या दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुन्हा पाहणी करण्याची तसदी घेतलेली नाही.

सिक्युरिटी प्लान बासनात
२६-११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारच्या रेल्वेमंत्र्यांनी कल्याण स्थानकात इंटिग्रेटेड सिक्युरिटी प्लान राबवला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यासाठी निधीची तरतूद करण्याचे सूतोवाचही केले होते. हा प्लान बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे.

आम्हाला नाही वेटिंग रूम...
लांब पल्ल्यांच्या वातानुकूलित वर्गाच्या प्रवाशांसाठी वेटिंगरूम आहे. मात्र, ती प्रवाशांच्या तुलनेत लहान पडते. द्वितीय वर्ग किंवा अनारक्षित डब्यातून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी वेटिंगरूमची सोय नसल्याने ते फलाट क्रमांक-४ आणि ५ वरच पथारी पसरतात. बरेचजण पश्चिमेकडील तिकीट खिडकीच्या मोकळ्या जागेतच सामान घेऊन बसतात. त्याचा गैरफायदा भिकारी व गर्दुल्ले घेतात.

Web Title: Prostitution business tightens in Kalyan railway station premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.