उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी 

By सदानंद नाईक | Published: November 8, 2022 05:13 PM2022-11-08T17:13:39+5:302022-11-08T17:14:19+5:30

अभिनेता तुषार कपूर, मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

prabhat feri on the occasion of guru nanak jayanti in ulhasnagar | उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी 

उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी 

googlenewsNext

सदानंद नाईक 

उल्हासनगर : गुरुनानक जयंती निमित्त शहरातून प्रभाग फेरी काढण्यात आली असून प्रभाग फेरीवर हेलिकॉप्टरातून पुष्पाचा वर्षाव करण्यात आला. फेरीत अभिनेता तुषार कपूर, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह हजारो जण सहभागी झाले.

 उल्हासनगरात दरवर्षी गुरुनानक जयंती निमित्त प्रभाग फेरीचे आयोजन केले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे प्रभाग फेरी काढण्यात आली नोव्हती. यावर्षी पुन्हा प्रभाग फेरीचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रभाग फेरी आशियातील सर्वात मोठी असून प्रभाग फेरीवर हेलिकॉप्टरने पुष्पाचा वर्षाव करण्यात येतो. अभिनेता तुषार कपूर, केबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह हजारो नागरिकांनी प्रभाग फेरीत सहभाग घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: prabhat feri on the occasion of guru nanak jayanti in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.