तणाव दूर करण्यासाठी करायचा अश्लील चाळे; ठाण्यातील विकृत पदवीधर बुलेटस्वाराचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:25 AM2019-02-16T02:25:47+5:302019-02-16T02:25:56+5:30

घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Pornographic pornography to relieve stress; Prolapse of a distorted graduate bullet in Thane | तणाव दूर करण्यासाठी करायचा अश्लील चाळे; ठाण्यातील विकृत पदवीधर बुलेटस्वाराचा प्रताप

तणाव दूर करण्यासाठी करायचा अश्लील चाळे; ठाण्यातील विकृत पदवीधर बुलेटस्वाराचा प्रताप

Next

मुंबई : घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. वीरेन शहा (३८) असे त्याचे नाव असून, तणाव दूर करण्यासाठी तो हा प्रकार करत असल्याचे चौकशीतून समोर आले.
ठाण्याचा चरईचा रहिवासी असलेला शहा विवाहित असून, त्याला १० वर्षांचा मुलगा आहे. घाटकोपरच्या एका नामांकित मॉलमध्ये तो काम करतो. सोसायटीतही विविध उपक्रमांमध्ये तो सहभाग घेत असे. सोसायटीत समाजसेवक म्हणून त्याने स्वत:ची ओळख तयार केली. तो घरातून सुटाबुटात बाहेर पडायचा. त्यानंतर, हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जायला निघायचा. कोपरीवरून म्हाडा, संभाजी मैदानमार्गे तो घाटकोपरला जात असे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कोपरी परिसरात एकट्या जात असलेल्या तरुणीच्या छातीला स्पर्श करत त्याने पळ काढला होता. डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याची ओळख पटली नाही. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
त्या पाठोपाठ मे महिन्यातही त्याने अशाच प्रकारे एका महिलेची छेड काढली. दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शहाने म्हाडा कॉलनी, संभाजी मैदानाकडे मोर्चा वळविला. तेथे २ जानेवारी रोजी आजीसोबत निघालेल्या अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढल्याने स्थानिकांमध्ये असंतोष वाढला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढे, तक्रारीवरून शोध सुरू झाला. रहिवाशांनी त्याचे सीसीटीव्हीही पोलिसांना दिले. त्यानंतर, आणखी काही प्रकरणे उजेडात आली. मात्र, वैद्यकीय चाचणी नको, म्हणून ते तक्रारदार मागे फिरल्याचे तक्रारदार आजींकडून समजले. आता या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात तरुणीसोबत हा प्रकार घडल्यानंतर तिने न घाबरता पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, सपोनि माने, जाधव यांच्यासह अंमलदार राजेंद्र मोरे, कसार, खैरनार आणि घोडे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत, शुक्रवारी शहाला अटक केली.

‘साहब स्टेÑस आता था..’
‘साहब स्टेÑस आता था.. तब ऐसे करता था,’ असे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. त्याने अनेक मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: Pornographic pornography to relieve stress; Prolapse of a distorted graduate bullet in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.