ठाण्यात लाखाचा पोपट उडाला भुर्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:08 AM2017-11-10T01:08:37+5:302017-11-10T01:09:03+5:30

कोपरीतील नितीन भोईर यांच्या कुटुंबात गेली पाच वर्षे सदस्याप्रमाणे वावरणारा लाखाच्या किंमतीचा ‘सिझर’ नावाचा पोपट दोन दिवसांपूर्वी अचानकपणे उडून गेला

Parrot fired in the Thane Thane! | ठाण्यात लाखाचा पोपट उडाला भुर्र...!

ठाण्यात लाखाचा पोपट उडाला भुर्र...!

Next

ठाणे : कोपरीतील नितीन भोईर यांच्या कुटुंबात गेली पाच वर्षे सदस्याप्रमाणे वावरणारा लाखाच्या किंमतीचा ‘सिझर’ नावाचा पोपट दोन दिवसांपूर्वी अचानकपणे उडून गेला. या ‘बोलक्या’ जिवाने सहवास सोडल्यापासून घरातील चैतन्यच हरविले आहे. त्यामुळे त्याला शोधून देणा-याला मोठे बक्षीस देण्याची तयारी या कुटुंबाने दाखवली अहे.
भोईर यांच्या दिवसाची सुरूवातच सिझरच्या जय माता दी आणि जय सद्गुरू या जयघोषाने होत असे. अतिशय दुर्मीळ आणि बडबड्या म्हणून ओळखला जाणारा ग्रे आफ्रिकन जातीचा हा पोपट भोईर यांनी पाच वर्षांपूर्वी पुण्यातून विकत घेतला तेव्हा तो काही महिन्यांचाच होता. पुढे कुटुंबातील सर्वांचा लाडका बनलेला ‘सिझर’ कठीणात कठीण शब्दही सहज बोलू शकत होता. ‘सिझर’च्या टिवटिवाटाने घरभर वेगळेच चैतन्य रहायचे. त्याच्यासाठी स्वतंत्र घराच्या रूपाने आकर्षक पिंजरा होता. मात्र सिझरला कधी पिंजºयात ठेवण्याची गरजच भासली नाही. दिवसभर संपूर्ण बंगल्यात त्याचा मुक्त संचार असायचा. नितीन भोईर यांना तो पप्पा आणि त्यांच्या पत्नी टिना यांना मम्मी म्हणून हाक मारायचा. त्यांची मुलं दिया, हिनल आणि वेदांतसोबत एखाद्या मुलाप्रमाणेच तो घरात वावरला. दोन दिवसांपूर्वी तो अचनाक खिडकीतून उडाला अणि घरातील चैतन्यही सोबत घेऊन गेला. त्याच्या शोधात भोईर यांनी जवळपासचा वनाचा परिसर पिंजून काढला. स्वत:च्या फेसबुकवर त्याचे फोटो, व्हिडीओ अपलोड करून मित्रमंडळीना मदत करण्याचे आवाहनही केले. मात्र सिझरचा ठावठिकाणा न लागल्याने भोईर कुटुंबियांची तहान-भूक हरवली आहे.

Web Title: Parrot fired in the Thane Thane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.